Ayodhya Ram Mandir Inauguration : प्राणप्रतिष्ठापनेनंतर नरेंद्र मोदींनी मागितली प्रभू श्रीरामांची माफी, म्हणाले...

PM Narendra Modi : मंदिराच्या गर्भगृहात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेलदेखील उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधानांनी 11 दिवासांचा उपवास सोडला.
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. हमारे राम आ गये है. आता आमचे प्रभू राम तंबूत राहणार नाहीत. रामलल्ला मंदिरात राहणार. आजची वेळ ही प्रभू रामांची आपल्यावर आशीर्वादाची आहे. 22 जानेवारी 2024 ही फक्त तारीख नाही हे नवीन कालचक्र आहे. गुलामगिरीतून हे राष्ट्र उभे राहिले आहे. हजारो वर्षांनंतर लोक आजच्या दिवसाची चर्चा करतील. आपण सगळे खूप नशिबवान आहोत, हा क्षण आपण पाहत आहोत, जगत आहोत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू रामाची माफी मागितली.

'मी आज प्रभू श्रीरामाची माफी मागतो. आमच्या तपस्येत कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षांपर्यंत हे काम करू शकलो नाही. आज ती कमतरता भरून निघाली. मला खात्री आहे, की प्रभू राम नक्कीच क्षमा करतील,' असे नरेंद्र मोदी म्हणाले.

Narendra Modi
Ram Mandir in Ayodhya : 'राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज...'; मुस्लिम विचारवंत इक्बालांच्या कवितेने अभिमानाने फुलते छाती!

आजच दिवस विजयाचा नाही. तर विनयाचादेखील आहे. जे राष्ट्र इतिहासाला विसरते ते राष्ट्र संकटात सापडते. काही लोक म्हणते होते की राम मंदिरानंतर आग लागले. मात्र, राम मंदिर आग नाही ऊर्जा निर्माण करत आहे. त्या लोकांना मी आवाहन करतो, की त्यांनी येथे यावे त्यांनी अनुभती घ्यावी राम समाधान आहे, सत्य आहे. राम आनंद आहे, असेदेखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, आज अयोध्येमध्ये रामलल्लासोबत भारताचा 'स्व'परत आला आहे. संपूर्ण जागाला त्रासातून मुक्त करणारा भारत उभा राहिला आहे, हेच या कार्यक्रमातून दिसून येत आहे. आज 500 वर्षांनंतर रामलल्ला परत आले आहेत. रामराज्य आले आहे. सर्व घटकामध्ये राम आहे. आपण सर्वांना समन्वयाने चालावे लागणार आहे. समन्वय ठेऊन आचरण करणे हेच धर्म सांगतो. जिथे दुःख दिसते तेथे सेवा करू. मंदिर पूर्ण होता होता विश्वगुरु भारत बनेल, असा विश्वासदेखील मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

योगी आदित्यनाथ म्हणाले, आपल्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. आज भारताचे प्रत्येक शहर, गाव अयोध्याधाम झाले आहे. प्रत्येक मनात राम आहे. प्रत्येक जण राम राम म्हणत आहेत. राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. जगात अयोध्या असे स्थान आहे जेथे बहुसंख्याक समाजाला आपल्या देवासाठी लढाई लढावी लागली. रामासाठी प्रत्येक वर्गातील नागरिकांने स्वतःला समर्पित केले. मंदिर तेथेच होत आहे जेथे संकल्प केला होता. प्राणप्रतिष्ठेनंतर हा रामराज्याची सुरुवात आहे, असेदेखील योगी आदित्यनाथ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com