Narendra Modi Swearing in Ceremony : हाय अलर्ट, ड्रोनला बंदी, नो फ्लाय झोन..! मोदींच्या शपथविधीसाठी तगडा बंदोबस्त

Lok Sabha Election Result Narendra Modi Swearing in Ceremony NDA Rashtrapati Bhawan : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात हा सोहळा होणार आहे.
Narendra Modi in Rashtrapati Bhawan
Narendra Modi in Rashtrapati BhawanSarkarnama

Rashtrapati Bhawan : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपधविधी सोहळा रविवारी दिमागात होणार आहे. राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून आशिया खंडातील काही देशांचे प्रमुखही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी राष्ट्रपदी भवनमध्ये अभेद्य सुरक्षाव्यवस्थाची तयारी केली जात आहे. जमिनीपासून आकाशतही तगडी सुरक्षा असेल.

पोलिसांनी 9 व 10 जूनला राजधानी दिल्लीत नो फ्लाय झोनची घोषणा केली आहे. सोहळ्याच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांसह एसपीजी, राष्ट्रपतींचे सुरक्षा जवान, आयटीबीपी, गुप्तचर विभागाच्या टीम, एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो, एनडीआरएफसह विविध केंद्रीय यंत्रणाच्या टीम तैनात केल्या जाणार आहेत.

Narendra Modi in Rashtrapati Bhawan
Chandrababu Naidu : चंद्राबाबूंच्या पत्नीच्या संपत्तीत पाच दिवसांत तब्बल 535 कोटींनी वाढ; इतके पैसे आले कुठून?

ड्रोनविरोधी यंत्रणा, स्नायपर सज्ज

राष्ट्रपती भवन परिसरातील उंच इमारतींवर ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली जात आहे. एनएसजीच्या मदतीने डीआरडीओ कडूनही ड्रोनविरोधी यंत्रणेवर देखरेख ठेवली जात आहे. सोहळ्यामध्ये घुसखोरी रोखण्यासाठी वॉर्निंग प्रणाली आणि फेस आयडेंटिफिकेशन प्रमाणीला उपयोग केला जाणार आहे. उंच इमारतींवर स्नायपरही तैनात केले जाणार आहेत.

परदेशी पाहुणे मुक्कामी असलेल्या हॉटेलमधील सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांच्या सल्ल्याने विविध अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. जी-20 वेळी ठेवण्यात आलेल्या सुरक्षेसाठीच्या निकषांप्रमाणेच शपथविधी सोहळ्यातही सुरक्षा असेल. हॉटेल ते राष्ट्रपती भवनपर्यंतच्या रस्त्यावर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवली जाणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com