Narendra Modi On G 20 : दिल्लीत आंतरराष्ट्रीय नेत्यांची 'मूव्हमेंट'; वाद टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचा भाजप मंत्र्यांना मोठा सल्ला

BJP Minister : उदयनिधींच्या सनातनविरोधातील वक्तव्यानंतर भाजप आक्रमक
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi Political News : इंडिया व भारत या वादामुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी इंडिया आघाडीकडून या मुद्यावरून केंद्र सरकारला घेरले जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चिंतेत भर पडली आहे. दुसरीकडे भारतात 'जी २०' शिखर परिषद होत आहे. त्यामुळे आगामी काळात आंतरराष्ट्रीय नेते मंडळींची रेलचेल नवी दिल्लीत असणार आहे. त्यामुळे अधिकृत मंत्री किंवा व्यक्तीनेच बोलावे बाकी मंडळींनी इंडिया भारत वादावर बोलू नये, अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी कॅबिनेटच्या बैठकीत दिला आहे. (Latest Political News)

Narendra Modi
Ajit Pawar In Thane : ठाण्यातील दहीहंडीत यंदा अजित पवारांचा बोलबाला; काय आहे कारण ?

आगामी काळात दिल्लीत जी २० शिखर परिषद होत आहे. त्यासाठी अनेक देशांचे नेते भारतात येत असल्याने भारतीय वृत्तपत्र आणि माध्यमात इंडिया भारताचा वाद दिसत आहे. त्यासाठी या विषयावर न बोलण्याच्या सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या आहेत. येत्या काळात इंडिया-भारत वादावर आरोप प्रत्यारोप करीत राहिल्यास त्याबद्दल नकारात्मक संदेश जगभरात पोचण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी मोदींनी भाजप नेत्यांना हा सल्ला दिल्याचे समजते.

Narendra Modi
PCMC News : मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली ; आता अंतरवाली सराटीनंतर पिंपरीतही बेमुदत उपोषण

दरम्यान, तामिळनाडुचे मुख्यमंत्री एक. के. स्टॅलिनचे पुत्र उदयनीधी यांनी सनातन धर्मावर टीकेची झोड उठवली. सनातन धर्मावर बोलल्याने देशभरातील भाजप आक्रमक झाले आहे. याची दखल खुद्द पंतप्रधान मोदींनी दखल घेत टीका केली.

या वेळी त्यांनी सहकारी मंत्र्यांना सनातन धर्मावर बोलण्यास मोकळीक दिली आहे. येत्या काळात इंडिया-भारतावर बोलल्याने मतांवर परिणाम होईल, म्हणून सनातनचा मुद्दा महत्वाचा मानला जात आहे. यावर बोलण्यास भर बैठकीतच पंतप्रधान मोदी यांनी परवानगी दिली असल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com