Ajit Pawar In Thane : ठाण्यातील दहीहंडीत यंदा अजित पवारांचा बोलबाला; काय आहे कारण ?

Tembhi Naka Dahihandi : मोदी, शहा, फडणवीसांच्या पाठोपाठ टेंभीनाक्यावर अजितदादांचा 'बॅनर'
Banner In Thane
Banner In ThaneSarkarnama

Thane Political News : राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणाचा परिणाम सांस्कृतिक कार्यक्रमांवरही दिसू लागला आहे. गेल्या वर्षीच्या विरोधक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा मित्र झाले आहेत. या नव्या मित्रांचे टेंभी नाका येथील दहीहंडींच्या कार्यक्रमात मोठे फलक झळकत असल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

गेल्या वर्षी ठाण्यातील टेंभी नाका येथे दहीहंडी कार्यक्रमात हिंदुत्वाचा नारा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचे भले मोठे बॅनर लावले होते. यंदा राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे टेंभी नाक्यासह ठाणे शहरातील अनेक प्रमुख दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी यावर्षी आणखी एका नव्याने बॅनरची भर पडल्याचे पाहण्यास मिळाले. त्यावर अजित पवार दिमाखात झळकताना दिसत आहेत. त्या बॅनरमुळे यंदा ठाणे शहरात सर्वत्र अजितदादांच्या बॅनरचा बोलबाला पाहण्यास मिळत आहे. (Maharashtra Political News)

Banner In Thane
Manoj Jarange Patil : सरकारच्या 'जीआर'नंतर जरांगेंचे एक पाऊल मागे; चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवणार

मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर गतवर्षी टेंभीनाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर ठाण्यातील टेंभीनाका येथे लावले गेले होते. त्याचप्रमाणे यंदा ही टेंभानाक्यावर मोदी, शहा, फडणवीस यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही (Ajit Pawar) बॅनरची झळकला आहे.

Banner In Thane
PCMC News : मराठा आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढली ; आता आंतरवाली सराटीनंतर पिंपरीतही बेमूदत उपोषण

ठाण्यातील टेंभी नाक्यासह अजित पवारांचे मोठे बॅनर गोकुळनगर येथे भाजप माजी नगरसेवक कृष्णा पाटील, वर्तकनगर येथे आमदार प्रताप सरनाईक, हिरानंदानी मेडोज येथे शिवाजी पाटील तर रघुनाथ नगर येथे माजी आमदार रवींद्र फाटक या प्रमुख हंड्यांच्या ठिकाणी लागले आहेत. त्यामुळे यंदा ठाण्यात उपमुख्यमंत्री पवारांची मोठी चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचा राष्ट्रवादीतील अजित पवारा गटाला फायदा होणार का, हे मात्र आगामी काळात पाहायला मिळेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com