National Herald case : सोनिया गांधी, राहुल गांधींच्या अडचणी वाढणार?, 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात 'ED'ची मोठी कारवाई!

ED's Major Action in National Herald Case : जाणून घ्या, आता EDने या प्रकरणात नेमकं कोणतं पाऊल उचललं आहे, ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
Enforcement Directorate initiates fresh action against Sonia and Rahul Gandhi in the ongoing National Herald case, intensifying legal scrutiny.
Enforcement Directorate initiates fresh action against Sonia and Rahul Gandhi in the ongoing National Herald case, intensifying legal scrutiny. sarkarnama
Published on
Updated on

ED action in National Herald case :अंमलबजावणी संचलनालय(ED)ने शनिवारी काँग्रेस नियंत्रित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड(AJL)शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीची भाग म्हणून जप्त केलेल्या तब्बल ६६१ कोटींची स्थावर मालमत्तेच्या ताब्यासाठी नोटीस बजावली आहे. यंत्रणेने एका निवेदनात सांगितले आहे की, त्यांनी संबंधित कागदपत्रे सक्षम मालमत्ता निबंधकांकडे सादर केली आहेत, जिथे या मालमत्ता आहेत.

याचबरोबर ही नोटीस या मालमत्तांच्या प्रमुख भागांवर शुक्रवारी चिकटवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये दिल्लीतील आयटीओ(५अ, बहादूर शाह जफर मार्ग) येथील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे(पूर्व) परिसरातील मालमत्ता(प्लॉट क्रमांक २, सर्व्हे क्रमांक ३४१) आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमधील बिशेश्वर नाथ मार्ग(मालमत्ता क्रमांक -१) येथील एजेएल बिल्डिंग यांचा समावेश आहे.

Enforcement Directorate initiates fresh action against Sonia and Rahul Gandhi in the ongoing National Herald case, intensifying legal scrutiny.
EVM Hacking Claims : EVM हॅक करून निकाल बदलणे शक्य? ; अमेरिकन इंटेलिजन्सच्या दावा, तर भारतानेही दिले स्पष्टच उत्तर, म्हटलं..

नोटीसमध्ये प्रामुख्याने ईडीने ताब्यात घेतले जाणारे परिसर रिकामे करण्यास सांगितले आहेत. मुंबईतील वांद्रे(पूर्व) येथील हेराल्ड हाऊसच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या मजल्यावर असलेल्या जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडला दरमहा भाडे रक्कम अंमलबजावणी संचालनालयाच्या संचाकलकांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. असे त्यात सांगण्यात आले आहे.

Enforcement Directorate initiates fresh action against Sonia and Rahul Gandhi in the ongoing National Herald case, intensifying legal scrutiny.
MSRTC salary issue : 'एसटी' कर्मचाऱ्यांच्या पगाराचा गोंधळ; पण नेते कुठे झाले गायब?

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या(पीएमएलए) कलम ८(८) आणि नियम ५(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये ईडीने जप्त केलेल्या आणि निर्णय प्राधिकरणाने पुष्टी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रदान केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com