सिध्दू अडचणीत; निवडणुकीच्या 24 दिवस आधी बहिणीने केले गंभीर आरोप

पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू कौटूंबिक वादात अडकले आहेत.
Navjot Singh Sidhu News
Navjot Singh Sidhu NewsSarkarnama
Published on
Updated on

अमृतसर : पंजाब विधानसभा निवडणुकीची (Punjab Election 2022) रणधुमाळी सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) कौटूंबिक वादात अडकले आहेत. सिध्दू यांच्या परदेशात राहणाऱ्या बहिणीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) 24 दिवस आधी हे आरोप करण्यात आल्याने सिध्दू यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.(Navjot Singh Sidhu News)

सिध्दू यांच्या बहीण सुमन तूर (Suman Toor) यांची बहीण अमेरिकेत राहते. त्यांनी चंदीगडमध्ये येऊन शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, सिद्धू यांनी वडील भगवंत सिध्दू यांच्या मृत्यूनंतर आई निर्मल आणि मोठ्या बहिणीला घरातून बाहेर काढले. त्यानंतर रेल्वे स्थानकात एका बेवारस प्रमाणे आईचा मृत्यू झाला. आईने आपली ओळख लपवली होती. सिद्धू यांनी हे सगळं संपत्तीसाठी केल्याचा आरोप तूर यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत तूर यांना रडू कोसळलं.

Navjot Singh Sidhu News
मोठी घडामोड : सर्वोच्च न्यायालयानं निलंबन रद्द केलं तरी विधानसभा अध्यक्षच निर्णय घेणार!

मी 1990 मध्ये अमेरिकेत (America) गेले. पण सिध्दूंनी आईचे खूप हाल केले. मी अनेकदा सिध्दूंशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण मला घरात घुसू दिले नाही. त्यांच्या अमृतसर येथील घरी 20 जानेवारी रोजी गेले होते. पण गेट उघडण्यात आलं नाही. सिध्दू यांनी मल व्हॉट्सअॅपवरही ब्लॉक केलं आहे. सिद्धू हे आपल्या आई-वडिलांविषयी खोटं बोलत आहेत. त्याबाबतची कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचा दावा तूर यांनी केला आहे.

सिध्दू यांनी म्हटलं होतं की, आईवडील मी दोन वर्षांचा असताना वेगळे झाले होते. पण हे खोटं आहे, असे सांगत तूर यांनी कुटुंबाचा फोटो दाखवला. दरम्यान, याबाबत सिध्दू यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सिध्दू यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांमुळे आता पंजाबमधील राजकारण ढवळून निघणार आहे.

पंजाबमध्ये सिध्दू व मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. सिध्दू यांच्यावर माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनीही गंभीर आरोप केले आहेत. आता सिध्दू यांच्या बहिणीनेही कौटुंबिक वाद जगासमोर आणत त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com