नवाब मलिक अभ्यासू; महाविकास आघाडी यांच्या पाठीशी आहे!

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
Yashomati Thakur, Congress
Yashomati Thakur, CongressSarkarnama
Published on
Updated on

धुळे : अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Minority devolopment minister Nawab Malik) हे अभ्यासू व जबाबदार मंत्री आहेत. ते कुठल्याही पुराव्याशिवाय गंभीर आरोप करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी मंत्री मलिक यांच्या पाठीशी आहे, असे सांगून महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर (Womens & child walefare minister Yashomati Thakur) यांनी मंत्री मलिक यांच्या भूमिकेचे समर्थन केले.

Yashomati Thakur, Congress
पंकजा मुंडेंचा टोमणा; कार्यक्रमात फक्त पंतप्रधान आणि मुंडे यांचाच फोटो शोभतो!

राज्यात ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक, अधिकाऱ्यांमध्ये रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ड्रग्जबाबत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक रोज वेगवेगळे गंभीर आरोप करीत आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काही आरोप केले. या प्रकरणी त्यांनी श्री. मलिक यांची बाजू घेतली.

मंत्री ठाकूर काल धुळे जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्या म्हणाल्या, की नवाब मलिक अभ्यासू व जबाबदार मंत्री आहेत. ते कुठल्याही पुराव्याशिवाय गंभीर आरोप करणार नाहीत. महाविकास आघाडी मंत्री मलिक यांच्या पाठीशी आहे. राज्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे, तसेच तीन मंत्र्यांच्या जावयांचे प्रकरण उघडकीस आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यावर मंत्री ठाकूर यांनी सोमय्या यांना कुणी सिरिअस घेतं का? काहींना अशा प्रकारची सवयच असते, असे म्हणत सोमय्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com