देवेंद्र फडणवीसांचा बॉम्ब : नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमिन खरेदी केली

Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मी जे सांगणार आहे, ती ना सलीम जावेदची स्टोरी, ना इंटरव्हल नंतरचा पिक्चर आहे. तर तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे, असे म्हणत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज बॉम्ब टाकला आहे. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून एलबीएस रोडवरील ३ एकर जागा खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक जवळपास रोजच पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातुन समीर वानखेडे आणि भाजपवर वेगवेगळे आरोप करत आहेत. याच पार्श्वभुमीवर आपण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज त्यांनी हा बॉम्ब फोडला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी दोन पात्र सांगत आहेत त्यात एक आहे सरदार शहा अली खान. हे १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सरदार शहा अली खान याच्यावर बॉम्बस्फोटातील सहभागाचा गुन्हा सिद्ध झाला आहे. टायगर मेमनच्या गाडीत RDX भरणारा, बाँम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी करणार शहा अली खान हा होता.

Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला इशारा अनिल परब दुसऱ्याच दिवशी खरा करणार?

तर दुसरे पात्र आहे मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. या व्यक्तीचा फोटो २०१२-१३ मध्ये आर. आर. पाटील यांच्यासोबत आला होता. त्यावरुन त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले होते. पण यात त्यांचा काहीही दोष नव्हता. हा सलिम पटेल दाऊदचा माणुस होता. तो दाऊदची बहिण हसिना पारकरचा ड्राईव्हर आणि बॉडिगार्डही होता. मुंबईत बिझनेस, प्रॉपर्टी या सगळ्याची कामे हाच बघायचा. जमिन व्यवसाय चालवण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्याकडे होती.

फडणवीस पुढे म्हणाले, कुर्लामध्ये तीन एकर जागा आहे. एलबीएस रोड या पॉश भागात १ लाख २३ हजार स्केअर फूटची ही जमिन आहे. या जमिनीचे रजिस्ट्रेशन सॉलिडस नावाच्या कंपनी सोबत झाले. हे झाले आहे गोवावाला नावाची फॅमिलीसोबत, पण याचा पॉवर ऑफ अटर्णी होल्डर समीर पटेल हा आहे. तर दुसरा विक्री करणारा सरदार शहा अली खान.

बॉम्ब फोडताना फडणवीस म्हणाले, ही सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नवाब मलिकांच्या कुटुंबीयांची कंपनी आहे. यावर फराज मलिक यांची सही आहे. २०१९ पर्यंत या कंपनीवर नवाब मलिक देखील होते पण मंत्री होण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. २००५ मध्ये २००० रुपये स्केअर फूट दराने ही जमीन खरेदी करण्यात आली. एकूण ३० लाखाला हा व्यवहार झाला. यातील देखील २० लाखच दिले आहेत. यातील १० लाख समीर पटेलच्या आणि ५ लाख सरदार खान यांच्या खात्यात जमा झाले.

Minister Nawab Malik criticise bjp and devendra fadanvis
जळगावमधील अत्याचाराच्या कथित घटनेच्या चौकशीचे आदेश, बड्या नेत्याच्या नावाची चर्चा

याच रजिस्ट्रेशनमध्येही घोळ घातला. स्टँम्प ड्यूटी कमी भरावी लागावी म्हणून हा घोळ घालण्यात आला. २००३ मध्ये जेव्हा हा व्यवहार सुरु झाला आणि २००५ मध्ये संपला. या काळात मलिक मंत्री होते. मग मग आता माझा प्रश्न आहे की, तुम्हाला माहित नव्हते का सलीम पटेल आणि सरदार कोण होते. त्यांच्यावर त्यावेळी टाडा होता. टाडा असलेल्या आरोपीची प्रॉपर्टी जप्त होते अशी तरतुद होती. मग ही प्रॉपर्टी जप्त होवू नये म्हणूनच ती मलिकांकडे ट्रान्सफर केली का? तुम्हाला कोण मुंबईत पॉश जागेत ३० लाखात जमीन देते? असा सवाल फडणवीस यांनी नवाब मलिकांना विचारला आहे.

इतकंच नाही तर अशा एकूण ५ प्रॉपर्टी आहेत, ज्यात ४ प्रॉपर्टींचा थेट अंडरवर्ल्डशी संबंधीत आहे. हे सगळे पुरावे मी चौकशी समितीला आणि शरद पवार यांना देणार आहे. त्यांनाही कळायला हवे की त्यांच्या मंत्र्यांनी काय रंग उधळले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com