Nawaz Sharif News : भारताविरोधात पाकिस्तानकडून झालेली 'ती' मोठी चूक नवाज शरीफ यांनीच केली मान्य, म्हणाले...

Nawaz Sharif accepted Pakistan mistake : नवाज शरीफांच्या 'या' विधानामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे.
Nawaz Sharif
Nawaz SharifSarkarnama
Published on
Updated on

Pakistan News : 'पाकिस्तानने भारताबरोबर केलेल्या एका सामंजस्य कराराचे उल्लंघन केले आणि ही आमची चूक होती.' असे म्हणत पाकिस्तान मुस्लीम लीग नवाज(पीएमएल-एन)चे नव-निर्वाचित अध्यक्ष नवाज शरीफ यांनी आपली चूक मान्य केली आहे. नवाज शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाच बुरखा पुन्हा फाटला आहे. यावेळी तर पाकिस्तानचा खरा चेहरा त्यांच्याच माजी पंतप्रधानांनी जगासमोर उघड केला आहे.

नवाज शरीफ(Nawaz Sharif) यांनी म्हटले की, 28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या होत्या. यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला आले होते आणि एका सामंजस्य करारावर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या होत्या. नवीज शरीफ यांनी पुढे सांगितले की, आम्ही मात्र त्या कराराचे उल्लंघन केले आणि ही आमची चूक होती. पीएमएल-एन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर एका बैठकीत नवाज शरीफ यांनी हे विधान केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

21 फेब्रुवारी 1999 रोजी शरीफ आणि वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांनी शिखर संमेलनानंतर लाहोर करारावर स्वाक्षरी केली होती. या करारात दोन्ही देशांमध्ये शातंता आणि स्थिरता कायम राखण्याबाबत म्हटले गेले होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनीच पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झाले होते.

पाकिस्तानेचे माजी पंतप्रधान असलेल्या शरीफ यांनी हाही दावा केला की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांना परमाणु कार्यक्रम रोखण्यासाठी पाच बिलियन डॉलरची ऑफर दिली होती. त्यांनी म्हटले की, मी हा प्रस्ताव फेटाळला होता. परंतु जर माझ्या खुर्चीवर माजी पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) असते, तर त्यांनी क्लिंटनची ऑफर नक्कीच स्वीकरली असती.

नवाज शरीफ यांनी हेही सांगितले की, 2017 मध्ये त्यांना पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब निसारद्वारे खोट्या प्रकरणात अडकवून पंतप्रधान पदावरून हटवलं गेलं. तसेच त्यांनी हेही सांगितले की त्यांच्या विरोधातील सर्व प्रकरणं खोटी होती. तर पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ(पीटीआय)चे संस्थापक इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खरे आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com