Pakistan General Elections : इम्रान खान आणि ISI ने टाकला मोठा डाव; नवाज शरीफ अडचणीत

Imran Khan and Isi Plan Against Nawaz Sharif : पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापनेवरून राजकीय डावपेच रंगले...
Nawaz Sharif, Imran Khan, Bilawal Bhutto
Nawaz Sharif, Imran Khan, Bilawal BhuttoSarkarnama
Published on
Updated on

Pakistan Politics :

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडून आठवडा उलटला तरीही अद्याप सत्तास्थापन आणि पंतप्रधान पदावरून खलबते सुरूच आहेत. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (PMLN) या पक्षाला सर्वाधिक जागा मिळून देखील ते सत्ता स्थापनेऐवजी विरोधी बाकावर बसण्याच्या विचारात आहेत.

यापूर्वी त्यांनी बिलावल भुत्तो यांच्या पीपीपी पक्षाच्या पाठिंब्याने लहान भाऊ शेहबाज शरीफ यांना पंतप्रधान करण्याचा विचार केला होता. मात्र ISI आणि Imran Khan यांच्या खेळीने ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Nawaz Sharif, Imran Khan, Bilawal Bhutto
Pakistan Politics : निवडणुकीच्या चार दिवसानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान ठरला; नवाझ शरीफ यांनी केली घोषणा

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यानंतर नवाज आणि शाहबाज शरीफ या भावामध्ये पीपीपी सोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. बिलावल भुट्टो यांनी देखील सत्तेत सहभागी न होता पीएमएनला पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले होते. मात्र पाकिस्तानच्या राजकारणात लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआय यांची प्रमुख भूमिका आहे. त्यामुळे आता नवाज शरीफ यांना लष्कराच्या हस्तक्षेपामुळे सरकार स्थापन करण्याऐवजी विरोधी बाकावर बसणे योग्य वाटत आहे.

कारण, पाकिस्तानी लष्कराने नवाज यांना विरोधी बाकावर बसण्यास सांगितले असल्याचा दावा जमात-उल-इस्लामीच्या (फजल) चे नेते अमीर फजल-उर-रहमान यांनी केला आहे. त्यामुळे नवाज शरीफ हे देखील पाकिस्तानात लष्कराच्या विरोधात जाण्याची हिंमत होत नसल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयला पक्षाला पाकिस्तानी लष्करामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे. असे असतानाही आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) च्या प्रतिनिधींनी तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांची भेट घेतली आहे. त्यानंतर इम्रान यांनी पीटीआय पक्षाच्या वतीने उमर अयुब खान यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. उमर अयुब हे पीटीआयचे सरचिटणीसही आहेत.

लष्कर आणि इम्रान खानच्या या भेटीनंतर पाकिस्तानच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे नवाज शरीफ त्यांच्या भावाला पंतप्रधान करण्याचा तयारी होते. मात्र आता इम्रान खान यांनी देखील पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्याने शरीफ हे आघाडी न करता विरोधी बाकावर बसण्याच्या विचारात आहेत.

Nawaz Sharif, Imran Khan, Bilawal Bhutto
Pakistan Election 2024 : ‘लंडन प्लॅन’ फेल! इम्रान खान यांची बॅट नव्हे ‘अपक्ष’ तळपले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com