Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षात दोन गट पडले आहेत. यातील अजित पवारांचा गट महायुतीसोबत सरकारमध्ये सहभागी झाला आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवारांचा गट विरोधी पक्षात आहे. त्यामुळे दोन्ही गटात नेहमीच राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता राष्ट्रवादीचा शरद पवार गट हा अजित पवार गटाच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे.
अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी 10 व्या अनुसूचीनुसार पक्षविरोधी कृती केल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून देखील कारवाई न झाल्यामुळे सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांनी ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटाचा कायदेशीर लढा सुरु आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यानंतर हा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचला. यावर सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. आयोगाच्या सुनावणी दरम्यान दोन्ही गट आपली बाजू भक्कमपणे मांडत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, ते येत्या काळात समोर येणारच आहे.
पण त्याआधीच आता राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला असून प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थेट राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे केल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर प्रफुल्ल पटेल काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
दरम्यान, मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये प्रफुल्ल पटेलही होते. त्यानंतर पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट झाल्याचीही चर्चा होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट एकत्र येणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आता राष्ट्रवादीचा शरद पवार गट अजित पवार गटाच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.