Ramdas Kadam News : "...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर डूख धरला होता!"; रामदास कदमांचा नवा गौप्यस्फोट

Shivsena Politics : " राज यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते म्हणूनच...."
Ramdas Kadam News
Ramdas Kadam NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने उद्धव ठाकरे गटावर टीकेची तोफ डागणारे शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून रामदास कदम यांच्याकडे पाहिलं जाते. शिंदेंच्या याच धडाडत्या तोफेने यापूर्वी शिवसेनेसह ठाकरेंबाबत अनेकदा धक्कादायक खुलासे केले आहेत. कदम यांनी आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. तसेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम(Ramdas Kadam) यांनी मीडियाशी संवाद साधला. कदम म्हणाले, शिवसेनेत राज ठाकरेंवर खूप अन्याय झाला आहे. उद्धव ठाकरेंना अध्यक्ष करण्याऐवजी राज ठाकरेंना केले असते, तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता. राज यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते म्हणूनच उद्धव यांनी माझ्यावर डूख धरला होता. त्यांच्या संपर्कात जी माणसं होती, त्यांना खाली खेचण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला.

...ही राज ठाकरेंची चूकच!

कदम म्हणाले, राज ठाकरेंनी उद्धव यांच्या अगोदर राजकारणास सुरुवात केली. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. त्यांच्याबाबत एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतात, पण याचसोबत राज यांची एक चूकही निदर्शनास आणून देण्यासही कदम यांनी मागेपुढे पाहिले नाही. ते ग्रामीण भागात जाऊन शेताच्या बांधावरसुद्धा उभे राहत नाही ही गोष्ट वाईट असल्याचे ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी इथपर्यंत पोहाेचल्याचे रामदास कदम म्हणाले. ते म्हणाले, मुख्यमंत्री व्हावे ही सगळ्यांचीच इच्छा असते. उद्धव ठाकरेही(Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले, पण बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यावेळी काँग्रेससोबत दुकान थाटावे लागेल. त्या दिवशी मी पक्ष बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. मात्र, आताचे नेते सोनिया गांधींचे पाय चाटतात, अशी टीकेची झोडही रामदास कदम यांनी उठवली.

...याचा विचार राज ठाकरेंनी करावा!

राज ठाकरेंच्या(Raj Thackeray) टोलमुक्त महाराष्ट्रावरून आंदोलन पेटलं आहे. यावर भाष्य करताना रामदास कदम म्हणाले, मनसेने टोलचा मुद्दा घेत आंदोलन सुरू केले आहे. हा विषय काही नवीन नाही, पण शासनाचे नुकसान होऊ नये, याचा विचार राज ठाकरे यांनी करावा. टोलमुक्त महाराष्ट्र झाला तर आनंदच असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Ramdas Kadam News
Sujay Vikhe-Patil News : खासदार विखेंनी राष्ट्रवादीच्या जगतापांना ऑफर देताना साधले योग्य टायमिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com