काँग्रेसने भाजपला चकवले अन्...

काँग्रेसने राज्यभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले.
congress
congresssarkarnama

पिंपरी : महाराष्ट्रातील कॉंग्रेसमुळे (Congress) देशभरात कोरोना पसरला असे वादग्रस्त विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी (ता.८) लोकसभेत केले होते. त्यावरून संतापलेल्या कॉंग्रेसने बुधवारी (ता.९) राज्यातील भाजपच्या सर्व कार्यालयाबाहेर `शर्म करो` आंदोलनाची घोषणा कालच केली होती. त्यामुळे पक्षाच्या पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) कार्यालयाबाहेर सकाळी दहापासूनच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते. पण, दुपारपर्यंत कॉंग्रेसचे कोणीच तिकडे न फिरकल्याने ते सर्व निघून गेले. त्यानंतर सायंकाळी कॉंग्रेसने भाजप (BJP) कार्यालयाबाहेर जोरदार निषेध आंदोलन केले.

congress
दोन कॅबिनेट मंत्र्यांसह ज्येष्ठ नेत्यांना तुरूंगात टाकण्याची ईडीची तयारी; राऊतांचा गौप्यस्फोट

दरम्यान, दुपारपर्यंत कॉंग्रेसचे कोणीही भाजप कार्यालयाकडे न फिरकल्याने कॉंग्रेस घाबरली, असे वक्तव्य शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले होते. त्याचा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी संध्याकाळी खरपूस समाचार भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर घेतला. ''अरे, बाळा, कॉंग्रेसेचा जन्म झाला तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे तुझ्या आईवडिलांना विचार कॉंग्रेस काय ते'' असा टोला त्यांनी थोरात यांना उद्देशून लगावला. भाजपने शहरात कुठेही कुठल्याही मैदानात बोलवावे, तेथे कॉंग्रेसचा सैनिक म्हणून मी येतो. तुमचे आव्हान मी स्वीकारले आहे, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले. तसेच शहर व येथील पालिका निर्माण करण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे.

congress
महाराज; मोदींना माफ करा म्हणत राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

मोठे प्रकल्प पक्षाने आणले, शहरात उद्योग आणले. त्यात भाजपचा कसलाच, कुठलाच सहभाग नव्हता, असा टोमणा त्यांनी मारला. महाराष्ट्रातील जनतेची मोदींनी जाहीर माफी मागितलीच पाहिजे, असे ते म्हणाले. सकाळी आंदोलन का केले नाही, यामागील कारण सांगताना कामगारनेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची पुण्यतिथी असल्याने या कामगारनगरीत सकाळी पक्ष कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे सकाळी हे आंदोलन झाले नाही. ते संध्याकाळी केले, असे डॉ. कदम यांनी या आंदोलनानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com