Karnataka Election Results : साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून फडणवीसांनी हिणवलेल्या निपाणीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव !

Karnataka Assembly Election Result : भाजपच्या शशिकला जोल्लेंचा सात हजार मतांनी विजय
Shashikala Jolle, Uttamrao Patil
Shashikala Jolle, Uttamrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Nipani Constituency : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत समीभागातील मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघात भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमदेवार दिला होता. त्यामुळे येथील निवडणूक कर्नाटकसह महाराष्ट्रासाठीही लक्षवेधी ठरली होती. या मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय झाला आहे. दरम्यान, येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांनी आघाडी घेतली होती. ते दुसऱ्या स्थानी राहिले, तर काँग्रेसचे काकासाहेब पाटील तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

Shashikala Jolle, Uttamrao Patil
Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या निम्म्या जागा घटल्या आहेत. तर जेडीएसच्या जागांमध्येही घट झाली आहे. दरम्यान, सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळाली नाही. दरम्यान, निपाणी मतदारसंघात चार अपक्षांसह १० उमेदवार आपले नशिब आजमावत होते. त्यात काँग्रेसचे काकासाहेब पाटील, जेडीएसचे राजाराम पवार, आपचे राजेश बनावण्णा, भाजपच्या शशिकला जोल्ले, केआरपीपीचे शकुंतला तेली, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांचा समावेश होता. त्यात भाजपच्या शशिकला जोल्ले यांचा विजय झाला आहे.

या मतदारसंघात एकूण एक लाख ८६ हजार ३६७ मतदान झाले. भाजपच्या शशिकला जोल्ले यांना ७२ हजार ९५२ मते मिळाली. त्यांनी एकूण मतांपैकी ३९.१४ टक्के मते घेतली. त्यांनी सात हजार ३०० मतांनी विजय मिळविला आहे. दुसऱ्या क्रमांकवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांना ६५ हजार ६१४ मते मिळाली. त्यांनी ३५.२१ टक्के मते घेतली. तर तिसऱ्या स्थानावरील काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांना ४३ हजार ९३२ मते मिळाली आहेत.

Shashikala Jolle, Uttamrao Patil
Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

या मतदारसंघातून सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील आघाडीवर होते. त्यानंतर शेवटच्या काही फेऱ्यात भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी आघाडी घेतली. त्यांनी सात हजार ३३८ मतांनी विजय मिळविला आहे. या मतदारसंघात महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचाराची राळ उठविली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा समावेश होता.

Shashikala Jolle, Uttamrao Patil
Karnataka Election Result : केवळ चार महिन्यात भाजपने गमावलं दुसरं मोठं राज्य; कुणाकडे किती राज्ये राहिली?

सीमा भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला होता. निपाणीत उत्तमराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले होते, "इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com