NCP MLA Disqualification Case : अजित पवारांना नागालँडमध्येही मोठा दिलासा; शरद पवारांना तिथेही धक्का...

NCP MLAs : राष्ट्रवादीच्या सात आमदारांविरोधात दाखल करण्यात आलेली अपात्रता याचिका विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagaland News : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच असल्याचा निकाल नुकताच दिला. तसेच त्यांच्या सर्व 41 आमदारांनाही पात्र ठरवलं. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला. त्यानंतर नागालँडमध्येही अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (NCP MLA Disqualification Case) 

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर नागालँडमधील पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्याविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून तेथील विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्रातील (Maharashtra) निकाल आल्यानंतर नागालँडमधूनही अजित पवारांसाठी खूशखबर समोर आली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Amit Shah News : पवारांना त्यांच्या मुलीला अन् ठाकरेंना त्यांच्या मुलाला..! अमित शहांचा दिल्लीतून निशाणा

राष्ट्रवादीचे सर्व सात आमदार पात्र असल्याचा निकाल नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमेर यांनी दिला आहे. शरद पवार गटाकडून करण्यात आलेली याचिका त्यांनी फेटाळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा आधार घेत त्यांनी हा निकाल दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधानसभा अध्यक्षांनी 16 फेब्रुवारीला दिलेल्या निकालानुसार, निवडणूक आयोगाचा निर्णय समोर आलेला आहे. ज्या आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यांना अजित पवारांना पाठिंबा दिला होता. आयोगाच्या निर्णयामुळे आता या आमदारांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तक्रार प्रलंबित ठेवण्यात काहीच औचित्य नाही.

शरद पवार गटाकडून 30 ऑगस्ट 2023 रोजी सात आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती. नागालँड राष्ट्रवादीचे अध्यक्ष वानथुंगो ओडयू यांनी विधानसभा अध्यक्ष कार्यालयाला 6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा आदेश उपलब्ध करून दिला होता. त्याआधारे अध्यक्षांनी अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी सात आमदार आहेत.

Ajit Pawar, Sharad Pawar
Akhilesh Yadav News : अखिलेश यांना चौथा झटका; सलीम शेरवानींनी दिला राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com