पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्यावर नाराज नाही पण हैराण झाले! सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र

गुजरातमधून सर्वाधिक श्रमिक रेल्वे धावल्याचे सुळे यांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून धावलेल्या रेल्वेगाड्यांची आकडेवारीच सादर केली.
Supriya Sule, PM Narendra Modi
Supriya Sule, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत काँग्रेसने तिकीटे वाटून मजूरांना इतर राज्यांत पाठवल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत केला आहे. त्यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही मोदींवर निशाणा साधला. मी पंतप्रधान मोदींवर नाराज नाही, पण त्यांच्या वक्तव्यामुळे हैराण असल्याचे सुळे म्हणाल्या. (Supriya Sule Slams PM Modi)

पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गुजरातमधून सर्वाधिक श्रमिक रेल्वे धावल्याचे सांगितले. त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून धावलेल्या रेल्वेगाड्यांची आकडेवारीच सादर केली. सुळे म्हणाल्या की, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काल लोकसभेत एक तासाचे भाषण केले. यामध्ये त्यांनी कोरोना, रोजगार, महागाई अशा विविध विषयांवर देशाला एक दिशा द्यावी अशी अपेक्षा होती. दुर्दैव की प्रधानमंत्री आपल्या महाराष्ट्राबद्दल (Maharashtra) बोलले. ही दुःख देणारी गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे फक्त भाजपाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. एका पक्षाच्यावतीने आणि एका राज्याच्यावतीने देशाचे पंतप्रधान बोलतात त्याचे फार दुःख झाले. पंतप्रधानपद हे पक्षाचे नाही तर संविधानिक पद आहे.

Supriya Sule, PM Narendra Modi
अजित पवारांच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध; माजी जिल्हा प्रमुखालाच अटक

महाराष्ट्राने फुल ना फुलाची पाकळी म्हणून भाजपाचे २२ खासदार निवडून दिले आहेत. त्यामुळे प्रधानमंत्र्यांना त्या पदावर बसविण्याचा मोठा सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रातील मतदारांचाही आहे. त्या महाराष्ट्राचा व मतदारांचा अपमान कोविड सुपर प्रेडर म्हणून प्रधानमंत्र्यांनी केला हे धक्कादायक आहे, अशी नाराजी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

कोविड सुपर स्प्रेडर म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख करताना प्रधानमंत्री महोदय रेल्वे ही केंद्र सरकार चालवते. तरीही प्रधानमंत्री बोलतात की महाराष्ट्राने लोकांना पाठवले. आम्ही एसटी, गाडी, टेम्पो, ट्रक पाठवू शकतो मात्र रेल्वे पाठवू शकत नाही. सातत्याने महाराष्ट्रावर टीका करणे, राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प हे महाराष्ट्रातून बाहेर नेणे, मुंबईचे महत्त्व कमी करणे यात त्यांना कसली गंमत येते? हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.

माननीय प्रधानमंत्री, तुम्ही महाराष्ट्राला कोविड सुपर स्प्रेडर कसे बोलले? याला वैज्ञानिक दृष्टीकोनही नाही. महाराष्ट्राची मुलगी आणि खासदार म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्यांकडे न्याय मागते तुम्ही असे का बोललात? लॉकडाऊन होण्याआधी खासदार सौगता रॉय यांनी संसद सुरू असताना प्रधानमंत्र्यांकडे जाऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर संसद लवकर संपवण्याची मागणी केली होती. मात्र प्रधानमंत्री यांनी त्यावेळी आता नाही नंतर बघुया काय करायचे, अशी प्रतिक्रिया दिली. त्याच कारण ही सर्व मंडळी मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात व्यस्त होती, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com