

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, या बाबत गेल्या काही दिवसापासून उलट-सुलट चर्चा सुरु आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. पण या चर्चेला आता खुद्द प्रफुल्ल पटेलांनी पूर्णविराम दिला आहे.
"मी प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये नाही," असे ठामपणे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अजितदादा आणि त्याच्या कुटुंबाबात माझ्या मनात आदर आहे,, अजितदादाच्या निधनाच्या दु:खातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही, असे ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घाईने करण्यात आला अशी टीका करण्यात येते, याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटेल म्हणाले की आम्ही कुठलाही उशीर न करता सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळा केला.
पहिला योग्य निर्णय घेतला दुसरा निर्णय घेण्याचा तयारीत आहोत. काम करा पुढे चला आणि वचन पाळा, हीच अजित दादांच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे अजित पवारांची श्रद्धांजली सभा झाली त्यानंतर पटेल हे माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेससारख्या रांगड्या प्रादेशिक पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा 'पाटील' हवा 'पटेल' नको, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली होती. याबाबत राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले. या प्रश्नाला पटेल संतापले.
"राज ठाकरे, वाकरे... ते माझ्या पक्षाशी संबंधित आहेत का, ते आमच्या पक्षात आहेत का? माझ्या पक्षाचा विधिमंडळ नेता आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा, हे राज ठाकरे किंवा सकाळी नऊ वाजताचं बुलेटिन (संजय राऊत) हे ठरवणार का?, असा प्रतिसवाल प्रफुल पटेल यांनी उपस्थित केला.
आम्ही आमच्या पक्षात काय करावं, हे अन्य पक्षातील नेते सांगत आहेत. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा नवा नेता निवडण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे. आम्ही योग्य निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहोत., असे पटेल यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.