PMC Mayor News: पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे; अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला

PMC mayor election Manjusha Nagpure mayor :  सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
PMC mayor election  Manjusha Nagpure mayor
PMC mayor election Manjusha Nagpure mayor Sarkarnama
Published on
Updated on

पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली आहे. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाल्या, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली.

मंजूषा नागपुरे या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी, भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केले आहे. महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती.

PMC mayor election  Manjusha Nagpure mayor
PCMC Mayor Election: पिंपरी-चिंचवडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; भाजपने दिलेले उपमहापौरपद नाकारून नगरसेवकाचा पालिकेतून काढता पाय

योगेश टिळेकर यांना आमदारकी दिल्याने त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा पत्ता कट करण्यात आला. तर मानसी देशपांडे या आमदार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्यात आले नसल्याची माहिती आहे.

  • पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत, येथे भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे.

  • पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे.

  • महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली होती.

  • 119 महिलांना संधी दिली होती. त्यापैकी 50 पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

पुण्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

​भाजप :119​राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27​काँग्रेस : 15​राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3​शिवसेना (UBT) : 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com