NEET JEE policy changes : NEET, JEE प्रवेशासाठी मोठा बदल? बोर्ड परीक्षेच्या गुणांना 50% वेटेज मिळण्याची शक्यता; काय आहे नेमका प्लॅन?

NEET JEE latest admission update : NEET आणि JEE प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. बोर्ड परीक्षेच्या गुणांना 50% वेटेज देण्याच्या प्रस्तावामुळे विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
NEET JEE policy changes : NEET, JEE प्रवेशासाठी मोठा बदल? बोर्ड परीक्षेच्या गुणांना 50% वेटेज मिळण्याची शक्यता; काय आहे नेमका प्लॅन?
Published on
Updated on

देशातील NEET आणि JEE सारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकार नव्या धोरणाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावानुसार मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत 12वी बोर्ड परीक्षेतील गुणांना तब्बल 50 टक्के वेटेज दिले जाऊ शकते.

सध्या मेडिकल आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मुख्यतः प्रवेश परीक्षांच्या गुणांच्या आधारे दिला जातो. बोर्ड परीक्षेतील गुण केवळ पात्रता निश्चित करण्यापुरते महत्त्वाचे असतात. मात्र नव्या प्रस्तावामुळे बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा या दोन्हींचा एकत्रित विचार करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाऊ शकते.

NEET JEE policy changes : NEET, JEE प्रवेशासाठी मोठा बदल? बोर्ड परीक्षेच्या गुणांना 50% वेटेज मिळण्याची शक्यता; काय आहे नेमका प्लॅन?
Gokul Milk Union : गोकुळ दूध संघात नेमकं चाललंय काय? आता तब्बल 1800 दूध संस्था चौकशीच्या फेऱ्यात!

या बदलामागील प्रमुख उद्देश म्हणजे एका परीक्षेवर अवलंबून राहण्याची पद्धत कमी करणे. अनेक विद्यार्थी वर्षभर अभ्यास करूनही एका दिवसाच्या परीक्षेतील कामगिरीवर त्यांचे भवितव्य ठरत असल्याने त्यांच्यावर मोठा ताण येतो. बोर्ड परीक्षेच्या गुणांनाही महत्त्व दिल्यास विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन मिळेल, असे मानले जात आहे.

गेल्या काही वर्षांत विविध प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटी, मूल्यांकनातील चुका आणि इतर तांत्रिक अडचणींच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर प्रवेश प्रणाली अधिक पारदर्शक आणि संतुलित करण्यासाठी हा पर्याय पुढे आला आहे.

NEET JEE policy changes : NEET, JEE प्रवेशासाठी मोठा बदल? बोर्ड परीक्षेच्या गुणांना 50% वेटेज मिळण्याची शक्यता; काय आहे नेमका प्लॅन?
Pune Police Bishnoi Gang Operation : पुण्याच्या पोलिसांच्या मास्टर प्लॅनने 'बिश्नोई' गँगचा गेम उधळला : थेट राजस्थनात जाऊन धडक कारवाई

या विषयावर शिक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी 9 सदस्यीय समितीची स्थापना केली होती. विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासेसवरील वाढती अवलंबित्व, डमी शाळांची वाढती संख्या आणि प्रवेश परीक्षांमधील निष्पक्षता यासारख्या मुद्द्यांचा अभ्यास या समितीकडून करण्यात आला आहे. समितीचा अंतिम अहवाल येत्या काही आठवड्यांत सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com