Gokul Milk Union : गोकुळ दूध संघात नेमकं चाललंय काय? आता तब्बल 1800 दूध संस्था चौकशीच्या फेऱ्यात!

Gokul Milk Union dairy society verification process : गोकुळ दूध संघाशी संबंधित सुमारे 1800 दूध संस्थांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 2021 नंतर नोंद झालेल्या संस्थांची फेरतपासणी होणार असल्याने दुग्ध व्यवसाय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
Gokul Dudh Sangh
Gokul Dudh SanghSarkarnama
Published on
Updated on

गोकुळ दूध संस्थांमधील व्यवसायातील आणि मध्यंतरी आदेशातील दूध संस्थांचा वाद दुमसत असताना पुन्हा एकदा 1800 दुध संस्थांची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये 2021 नंतर नोंद झालेल्या दूध संस्था पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी गुरुवारी प्रशासक मंडळातील सदस्य सुनील धायगुडे, सागर बलकवडे यांची भेट घेत २०२१ नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्थांची माहिती त्यांनी मागविली आहे. त्यामुळे गोकुळ सलग्न या दूध संस्थांची आता चौकशी होणार आहे.

Gokul Dudh Sangh
Parliament Monsoon Session 2026 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून गाजणार; मोदी सरकार पुन्हा आणणार 'महिला आरक्षण विधेयक'?

येत्या चार दिवसात माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, असे धायगुडे, बलकवडे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळकडे २०२१ नंतर नोंदणी झालेल्या दूध संस्थांची चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. मात्र नियुक्ती दरम्यान ठाकरे अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांची सुनावणी त्यानंतर गोकुळ निवडणुकीसाठी दूध संस्थांकडून ठराव मागविण्याच्या प्रक्रियेत व्यस्त होते.

'या' संस्थांना दिलासा

पुणे दुग्ध निबंधक विभागीय कार्यालयातील राजकुमार पाटील यांनी 427 दुध संस्थांचे सभासद व रद्द करा असे आदेश दिल्यानंतर गोकुळ मध्ये खळबळ उडाली होती. मात्र सरकार अशा प्रकारे दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करू शकत नाही. त्यामुळे या संस्थांना आता दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com