

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पंतप्रधान पदावर विराजमान होताच बालेन शाह यांनी आपल्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारीच बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कार्की आयोगाचा अहवाल लागू केला.
नेपाळमधील Gen-Z आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना अटक कऱण्यात आली आहे. माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन्ही नेत्याच्या अटकेबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत शाह यांनी आदेश दिला होता. नवनियुक्त पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत ही मोठी कारवाई करण्यात आली.
सत्ता स्थापन होताच बालेन शाह यांनी विरोधकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. केपी शर्मा ओली, रमेश लेखक या दोघांना अटक झाल्यानंतर नेपाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.अटक करण्यात आलेले दोन्ही नेते आता याविरोधात कायद्याची लढाई लढणार आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनाची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवाल आला आहे. यातील दोषी ठरवलेल्या व्यक्तीवर कारवाईचा बडगा उभारला आहे. सस्मित पोखरेल यांची सरकारचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. आंदोलनात बेजाबदारपणे वागल्याचा ठपका चौकशी समितीने केपी शर्मा ओली, आणि रमेश लेखक यांच्यावर ठेवला आहे.
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या विरोधात सप्टेंबर २०२५ मध्ये तरुण पिढीने (Gen-Z) तीव्र आंदोलनं केली होती. तरुणाई रस्यावर उतरली होती. यानंतर राडा झाला. यात तब्बल ७७ लोकांचा मृत्यू झाला होता. आंदोलकांनी संसद पेटवून दिली होती. या उग्र आंदोलनामुळे मंत्र्यांना हेलिकॉप्टरनं पळून जावं लागलं होतं. या प्रकरणात झालेल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे, असे पोखरेल यांनी सांगितले.
ओली, रमेश लेखक आणि तत्कालीन पोलीस प्रमुख चंद्र कुबेर खापुंग यांच्यावर राष्ट्रीय दंड संहितेच्या कलम १८१ आणि १८२ अंतर्गत खटला चालवण्याची शिफारस चौकशी आयोगाने आपल्या अहवालात केली होती, यानुसार दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. केपी शर्मा ओली यांचा कल नेहमीच चीनकडे राहिला आहे. त्यांच्या अटकेमुळे चीनच्या नेपाळमधील रणनीतीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.