Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

Ashok Kharat case, Nashik police complaint, खरातने त्याच्या 'कॅनडा कॉर्नर' येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे.
police investigation in Ashok Kharat case
police investigation in Ashok Kharat caseSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case: महिलांना फसवून अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) यांचे बिंग फुटल्यानंतर तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे, खरातसंदर्भात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

खरातने त्याच्या 'कॅनडा कॉर्नर' येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

police investigation in Ashok Kharat case
Ashok Kharat Wealth: अशोक खरात याची कुठे, किती आहे संपत्ती? यादी वाचा

पुजाविधीच्या नावानं महिलांवर अत्याचार करणाऱ्या खरातनं अनेक व्यावसायिकांनाही गंडा घातला असून गैरमार्गानं पैसे उकळले आहेत. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.

गुरूवारी त्याची 10 तासापेक्षांही अधिक काळ एसआयटीच्या पथकाने चौकशी केली. पोलीस कोठडीत देखील खरातचा मंत्रजप सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

police investigation in Ashok Kharat case
Ashok Kharat Case: खरातचा फास आवळण्यास सुरवात! चाकणकरही सदस्य असलेल्या ट्रस्टवर SIT ची मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनीही दिला आदेश

भले केले तेच माझ्यावर उलटले

तपासात तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या तपासात खरातने अजब दावा केला आहे, या दाव्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. "माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले," असे त्याने चौकशीत सांगितले.

police investigation in Ashok Kharat case
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट! खरा मास्टरमाईंड कोण? 58 व्हिडिओ पहिल्यांदा कोणी ताब्यात घेतले?

अजब दावा

मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही,महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे.यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असेही तो म्हणाला.

खरात यांची सध्या एसआयटी चौकशी करीत आहे. आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर खरात असल्याचे समजते. विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी ते करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com