Nepal Interim Government: माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्यावर तरुणाईचा भरोसा: अंतरिम सरकार बनविण्याचा प्रस्ताव

Nepal Gen Z Protest Live Updates: आंदोलक तरुणांनी काल (बुधवारी) देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून माजी सरन्यायाधीश सुशिका कार्की यांच्या नावाला प्रस्ताव दिला आहे. हजारो युवकांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहून सुशिका कार्की यांच्या नावाला होकार दर्शविला आहे.
Nepal Interim Government
Nepal Interim GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवांना मर्यादित परवानगी आहे.

  2. आंदोलक तरुणांनी माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांना अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नेमण्याचा प्रस्ताव दिला आहे.

  3. काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह तसेच अन्य नेते आणि अधिकारी यांनीही कार्की यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे, सीमेवर उत्तर प्रदेश पोलिस हाय अलर्टवर आहेत.

Nepal Gen Z Protest Live Updates:नेपाळमध्येही बुधवारी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. अंतरिम सरकारच्या नियुक्तीबाबत अनिश्चितता अद्याप कायम आहे. नेपाळमधील पंतप्रधानांपासून राष्ट्रपतींपर्यंत सर्व कॅबिनेट नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

परंतु संतप्त तरुणाईचा राग अद्यापही शांत झालेला दिसत नाही. पुढील हिंसाचार रोखण्यासाठी नेपाळच्या सैन्याने देशव्यापी संचारबंदीची घोषणा केली होती, स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात येत आहे.

आंदोलक तरुणांनी काल (बुधवारी) देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून माजी सरन्यायाधीश सुशिका कार्की यांच्या नावाला प्रस्ताव दिला आहे. हजारो युवकांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहून सुशिका कार्की यांच्या नावाला होकार दर्शविला आहे.

यापूर्वी, काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांचे नाव आंदोलकांची पसंती म्हणून समोर आले होते. 'बालेन'अशी ओळख म्हणून असलेले बालेंद्र शाह हे मुळचे अभियंता असून सध्या राजकारणात सक्रीय आहेत.

बालेंद्र शहा यांनीही कार्की यांना पाठिंबा जाहीर केला आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना त्वरित अंतरिम सरकार स्थापन करण्याची आणि संसद बरखास्त करण्याची विनंती केली. नेपाळच्या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अन्य नावांमध्ये धरानचे महापौर हरका राज राय उर्फ हरका संपांग, प्रसिद्ध अभियंता कुलमन घिसिंग आणि माजी मंत्री सुमना श्रेष्ठ यांचीही नावे चर्चेत आहेत.

नेपाळ सीमेवर उत्तर प्रदेश पोलीस हाय अलर्टवर

गेल्या तीन दिवसांत नेपाळमधील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, तरीही सीमेवर कडक पहारा आहे. पोलिस नेपाळी एजन्सींच्या संपर्कात आहेत परंतु भारतीय नागरिकांना मदत करणे आणि कोणत्याही प्रकारची गडबड रोखणे हे प्राधान्य आहे, असे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कृष्णा यांनी सांगितले.

Nepal Interim Government
Chhatrapati Sambhajinagar: प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव; शिवसैनिक अस्वस्थ

तरुणाईची भूमिका

  • ऑनलाईन बैठकांद्वारे हजारो युवकांचा सहभाग.

  • सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन.

  • आंदोलन शांततेकडे वळावे की आणखी तीव्र व्हावे, यावर मतभेद.

भारतीय सीमावर्ती परिस्थिती

  • उत्तर प्रदेश व बिहारमधील सीमावर्ती भागात पोलीस गस्त वाढली.

  • भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि स्थलांतरित नेपाळी नागरिकांबाबतची खबरदारी.

  • सीमा व्यापार आणि पर्यटनावर तात्पुरता परिणाम.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

  • भारत, चीन, अमेरिका यांसारख्या शेजारी देशांची भूमिका.

  • UN आणि मानवी हक्क संघटनांकडून निवेदन.

  • नेपाळच्या अस्थिरतेचा दक्षिण आशियाई राजकारणावर परिणाम.

Q1. नेपाळमध्ये काय सुरु आहे?
अंतरिम सरकारबाबत अनिश्चितता आणि नेत्यांच्या राजीनाम्यांमुळे तरुणांमध्ये रोष निर्माण झाला.

Q2. आंदोलकांनी अंतरिम सरकारसाठी कोणाचे नाव सुचवले?
माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांचे नाव सुचवले गेले.

Q3. बालेंद्र शाह यांनी काय भूमिका घेतली?
काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांनीही कार्की यांना समर्थन देत संसद बरखास्त करण्याची मागणी केली.

Q4. भारताने कोणती पावले उचलली आहेत?
उत्तर प्रदेश पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जाहीर करून कडक पहारा ठेवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com