Nepal Violence : विमानतळ बंद, घरांची जाळपोळ, एकाचा मृत्यू...; नेपाळमध्ये अचानक उफाळला हिंसासार, नेमकं काय घडलं?

Hindu Nation Demand Nepal : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्या समर्थकांच्या हिंसक निदर्शनांमुळे राजधानी काठमांडूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या हिंसेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे.
Nepal Violence
Nepal ViolenceSarkarnama
Published on
Updated on

Nepal Monarchy Supporters Protest : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये (Nepal) राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची मागणी करणाऱ्या समर्थकांच्या हिंसक निदर्शनांमुळे राजधानी काठमांडूमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

या हिंसेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Tribhuvan International Airport) तात्पुरते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विमानतळावरून होणाऱ्या सर्व विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

नेपाळ (Nepal) संसदेने 2008 साली राजेशाही रद्द केल्यामुळे नेपाळ धर्मनिरपेक्ष, संघराज्य, लोकशाही प्रजासत्ताक बनले. मात्र, आता नेपाळमध्ये पूर्वीप्रमाणे राजेशाही लागू करण्याची मागणी सुरू झाली आहे. माजी राजा ज्ञानेंद्र यांनी 19 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनानिमित्त जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन केल्यानंतर ही मागणी तीव्र झाली आहे.

Nepal Violence
Kunal Kamra update : कुणाल कामराला हायकोर्टाचा दिलासा; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश, महाराष्ट्रात येणार

अशातच शुक्रवारी नेपाळची राजेशाही आणि हिंदू राष्ट्र पुनर्स्थापित करण्याच्या मागणीसाठी सुरक्षा दल आणि समर्थकांमध्ये काठमांडूमध्ये मोठी चकमक झाली. तर यावेळी आंदोलकांनी अनेक घरांना इमारतींना आणि वाहनांना आग लावली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी (Police) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तिनकुणे, सिनामंगल आणि कोटेश्वर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सबीन महर्जन नावाच्या 29 वर्षीय आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

Nepal Violence
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लॉटरी, आधीच दादा भुसे मंत्री, आता आमदार कांदे झाले राज्यमंत्री!

दरम्यान, काठमांडूत उतरणाऱ्या सर्व विमानांना भारतात इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अशांततेमुळे गृहमंत्रालयात सुरक्षा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. गृहमंत्री रमेश ललकर यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला नेपाळचे पोलिस महानिरीक्षक, नेपाळी लष्कराचे प्रमुख आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीनंतर गृहमंत्री पत्रकार परिषद घेणार असून, त्यामध्ये ते आजच्या हिंसेसाठी माजी राजा ज्ञानेंद्र यांना जबाबदार धरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळमधील बिघडलेली परिस्थिती पाहता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे आता या बैठकीत ते काय निर्णय घेणार याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com