New Labour Law : नवीन लेबर कोड लागू! तुमच्या पगारापासून ते सुट्ट्यांपर्यंत सर्व काही बदलणार; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

new labour law impact on employees : देशात नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगार, पीएफ, कामाचे तास आणि सुट्ट्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. जाणून घ्या तुमच्या खिशावर याचा नेमका काय परिणाम होणार.
labour law update layoffs rules
labour law update layoffs rulesSarkarnama
Published on
Updated on

नवीन लेबर कोड लागू झाल्यानंतर देशातील नोकरदार वर्ग आणि कंपन्यांच्या कामकाजात मोठे बदल दिसणार आहेत. केंद्र सरकारने जुन्या कामदार कायद्यांना एकत्र करुन 4 नवीन लेबर कोड तयार केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम पगार, पीएफ, ग्रॅच्युइटी, कामाचे तास आणि सुट्ट्यांवर होणार असल्याने कर्मचारी वर्गात मोठी चर्चा सुरु आहे.

नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा एकूण CTC च्या किमान 50 टक्के असणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी होणारी रक्कम वाढेल. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळू शकतो. मात्र दुसरीकडे, पीएफ कपात वाढल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा मासिक पगार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

labour law update layoffs rules
Prateek Yadav death reason : प्रतीक यादव यांच्या निधनाने खळबळ; नेमकं कोणत्या आजाराने घेतला बळी? मुंबईत चालू होते उपचार

नवीन लेबर कोडमध्ये फिक्स्ड टर्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटीचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याआधी दीर्घकाळ सेवा आवश्यक होती, मात्र आता कमी कालावधीतही हा फायदा मिळू शकतो. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता मिळण्याची अपेक्षा आहे.

कामाच्या तासांबाबतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आठवड्यातील कमाल कामाचे तास 48 ठेवण्यात आले आहेत. कंपन्यांना हवे असल्यास 4 दिवस 12-12 तास काम घेण्याची मुभा असेल. त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना अधिक सुट्ट्या द्याव्या लागतील. अतिरिक्त वेळ काम घेतल्यास ओव्हरटाइमचा वेगळा मोबदला देणे बंधनकारक राहणार आहे.

महिलांसाठीही या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. महिलांना सर्व शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र त्यासाठी कंपन्यांनी सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. त्यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

labour law update layoffs rules
Pratik Yadav inside story : लॅम्बोर्गिनी, सुपरबाईक्स अन् बरंच काही... प्रतीक यादव यांच्या राजेशाही आयुष्याची Inside Story!

फूड डिलिव्हरी, कॅब सेवा आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सनाही नवीन सोशल सिक्युरिटी कोडचा फायदा मिळू शकतो. विमा आणि सामाजिक सुरक्षेच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला लेखी नियुक्तीपत्र देणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात येणार असल्याने नोकरीतील अटी अधिक स्पष्ट आणि सुरक्षित होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com