Jacinda Ardern Resigns : जगातील सर्वात तरुण न्यूझीलंडच्या (New Zealand) पंतप्रधान असलेल्या जसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर न्यूझीलंड राजकीय क्षेत्र ढवळून निघालं आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
जसिंडा अर्डर्न यांनी पक्षाच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 2017 मध्ये त्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या होत्या. पुढील महिन्यात राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या "पंतप्रधान पदावर राहून जबाबदारी पार पाडण्याची शक्ती आता माझ्याकडे नाही, त्यामळे मी लवकरच राजीनामा देणार आहे,"
जसिंडा अर्डर्न यांचा कार्यकाल 7 फेब्रुवारीला संपत आहे, त्या अगोदर जेसिंडा अर्डर्न यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यांनी कोविड-19 महामारी आणि क्राइस्टचर्च मध्ये झालेल्या दोन मशीदीवर झालेला दहशतवादी हल्ला यासह आणि व्हाइट आइलैंड ज्वालामुखी विस्फोटसारख्या कठीण परिस्थितीत देशाचं नेतृत्व केलं आहे.
"राजकीय नेता देखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर जबाबदारी आहे. ती जबाबदारी चोख पाडण्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या आम्ही केल्या. परंतु आता ती वेळ आली आहे."
"मला आशा आहे की न्यूझीलंडचे नागरिक मी घेतलेल्या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतील. खरा नेता तो आहे ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ कळते. मी सहृदय आहे; पण याचा अर्थ मी कमकुवत आहे, असा मुळीच नाही. एकाच वेळी तुम्ही सहृदय असू शकता आणि कणखर देखील..."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.