
बातमीत थोडक्यात काय?
केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांना येमेनमध्ये खून प्रकरणात 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार असून, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अधिक मदतीस असमर्थता दर्शवली आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार, आता फक्त 'ब्लड मनी' म्हणजे आर्थिक भरपाई स्वीकारल्यासच फाशी टाळता येऊ शकते.
निमिषा यांनी नर्सिंग व्यवसायात भागीदार असलेल्या येमेनी नागरिकाला छळ आणि पासपोर्ट जप्त केल्यामुळे गुंगीचं औषध दिल्याचं सांगितलं, पण त्याचा ओव्हरडोस होऊन मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
India’s Diplomatic Efforts in Yemen : केरळमधील नर्स निमिषा प्रिया यांचा जीव वाचविण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. केंद्र सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टात हात वर केले. निमिषा यांना 16 जुलैला येमेनमध्ये फाशी दिली जाणार आहे. त्यांची फाशी रोखण्यासाठी केरळपासून दिल्लीपर्यंत सर्व स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण त्यात अपेक्षित यश मिळाले नाही.
सुप्रीम कोर्टात सोमवारी केंद्र सरकारने हतबलता दर्शवली. निमिषा प्रिया यांची फाशी रोखण्यासाठी सरकार आणखी काही करू शकत नाही, असे कोर्टात सरकारच्या वतीने सांगण्यात आले. हे खूप दुर्दैवी आहे. सर्व प्रयत्न केले. पण आम्ही काही करू शकत नाही. त्याला काही मर्यादा आहेत, असे अटर्नी जनरल आर वेंकटरमणी यांनी कोर्टात सांगितले.
वेंकटरमणी यांनी आता केवळ एकच पर्याय असल्याचेही सांगितले. निमिषा प्रिया यांच्या हातून खून झालेल्या संबंधित व्यक्तीचे कुटुंब ‘ब्लड मनी’ म्हणजे आर्थिक भरपाई घेण्यासाठी तयार व्हायला हवे. मात्र, ही खासगी गोष्ट असल्याने सरकार त्यात काही करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निमिषा प्रिया या केरळातील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. येमेनमध्ये त्यांचा बिझनेस पार्टनर तलाल अबदो मेहदी यांच्या खून प्रकरणात येमेन येथील कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. निमिषा यांनी आपल्यावरील आरोपांविरोधात दाखल केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. आता त्यांना 16 जुलैला फाशी दिली जाणार आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाने आर्थिक भरपाई घेण्यासही नकार दिल्याचे समजते. त्यामुळे निमिषा प्रिया यांना फाशी होण्यापासून वाचण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. त्या 2008 पासून नर्स म्हणून काम करत होत्या. येमेनमध्ये 2014 मध्ये नागरी संघर्ष सुरू झाल्यानंतर त्यांचे पती मुलीसह भारतात परतले. मात्र, निमिषा तिथेच राहिल्या. होत्या.
काही कालावधीनंतर निमिषा यांनी येमेनी नागरिकासोबत तिथे नर्सिंग होम सुरू करण्यासाठी भागिदारी केली. निमिषा यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती आपला शारीरिक छळ करायची. त्याने आपला पासपोर्ट घेतला होता. आपला पासपोर्ट मिळवून स्वत:चा बचाव करण्यासाठी संबंधित व्यक्तीला गुंगीचे औषध दिले. पण ओव्हरडोस झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे निमिषा प्रिया यांचे म्हणणे आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: निमिषा प्रिया यांना कोणत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली आहे?
उत्तर: येमेनमधील बिझनेस पार्टनरच्या खून प्रकरणात त्यांना फाशी ठोठावली आहे.
प्रश्न: केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात काय सांगितले?
उत्तर: सरकारने सांगितले की, त्यांनी सर्व प्रयत्न केले असून आता आणखी काही करता येणार नाही.
प्रश्न: फाशी टळण्याचा एकमेव पर्याय कोणता आहे?
उत्तर: संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाने 'ब्लड मनी' स्वीकारणे हाच एकमेव पर्याय आहे.
प्रश्न: निमिषा प्रिया यांचं या प्रकरणाबाबत काय म्हणणं आहे?
उत्तर: त्यांनी सांगितले की, त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गुंगीचं औषध दिलं होतं, ज्याचा ओव्हरडोस झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.