Nine Years Of Modi Govt : सत्तेत येऊन मोदी सरकारला (Modi Government) नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मोदी सरकारने (PM Modi) आणि विशेषतः भाजपने जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे ते 15 जून असे महिन्याभराचे हे जनसंपर्क अभियान सुरु आहे.
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे, यावर काँग्रेसने भाजप, मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या टि्वट हॅडलवरुन मोदी सरकारच्या नऊ वर्षांचा लेखाजोखा मांडला आहे.
मोदी सरकारने दिलेली आश्वासनं, घोषणा, निवडणूक जाहीरनामा यांच्यावर काँग्रेसने जहरी टीका केली आहे. गेल्या नऊ वर्षात जनतेला महागाई,बेरोजगारी, हुकूमशाही सहन करीत आहे. खोट्या आश्वासनांवर मोदी सरकार सत्तेत आले, या सरकारनं कुठलेही आश्वासन पाळले नाही, असे काँग्रेसनं टि्वट म्हटलं आहे.
नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली. बँकासमोर लागलेल्या रांगामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, या घटना कुणीही विसरणार नाही, जीएसटीमुळे व्यापार-उद्योगाला तोटा सहन करावा लागत आहे, असे काँग्रेसने म्हटलं आहे. कर्नाटकमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवला आहे, आगामी निवडणुकीमध्येही भाजपला त्याचा फटका बसेल, असे काँग्रेसनं म्हटलं आहे.
भाजपने जनसंपर्क अभियान सुरवात केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहेत, भाजपची सध्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला जात आहे.
मोदी सरकार सत्तेत येऊन नऊ वर्षे पूर्ण झालीत तर सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदी सरकार 2.0 ने दोन वर्षे पूर्ण केल्यानिमित्ताने भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदारावर जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार आणि आमदारांना हे अभियान आपल्या मतदारसंघात राबवण्यास सांगितले आहे.
या अभियानांतर्गत भाजपचे खासदार शिक्षक, वकिल, खेळाडू, कलाकार, व्यापारी यांच्या संपर्कात राहणार आहे. तसेच मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. योजनांचा काय लाभ झाला, जीवनात काय बदल झाले हे सांगणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगितले आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.