Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्यूला ठरला; कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर.

BJP Shivsena formula for lok sabha : एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली.
 Shinde-Fadanvis Government|
Shinde-Fadanvis Government| Sarkarnama

BJP Shivsena formula for lok sabha : आता एक वर्षावर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यासाठी बहुतांश पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी यासाठीच्या बैठका सुरू केल्या आहेत. (Maharashtra BJP Shivsena formula for lok sabha election 2024)

महाविकास आघाडीतले शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठका होत असताना दुसऱ्या बाजूला हे तिन्ही पक्ष स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. तर दुसरीकडे भाजप-शिवसेना यांच्यातील जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. काल (गुरुवारी) शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली.

 Shinde-Fadanvis Government|
Nitesh Rane : 'हिच ती वेळ..उरलेलं दुकान बंद करण्याची..' ; राणेंचा ठाकरेंना टोला

या बैठकीत २६-२२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते. आगामी लोकसभेसाठी भाजप २६ तर शिवसेना २२ जागा लढविणार असल्याची प्राथमिक चर्चा झाली आहे. यानंतर अजून बैठक होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कोर कमिटीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसची आगामी निवडणुकांसाठीची भूमिका मांडली.

 Shinde-Fadanvis Government|
Mumbai News : फडणवीसांची मोठी घोषणा ; झोपडपट्टीधारकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, अडीच लाखात..

येत्या दोन तीन तारखेला (२, ३ जून) आम्ही राज्यातल्या सगळ्या जागांवर चर्चा करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, नेते, आजी-माजी खासदार-आमदार, प्रमुख नेते या सगळ्यांना मुंबईत बोलावून प्रत्येक जागेवर चर्चा करू. त्या माध्यमातून तीन पक्षांची जी समिती तयारी झाली आहे. त्या समितीला सामोरे जाऊ, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले.

यासोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील आता तयारी चालू केली आहे. लोकसभेच्या सहा जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुक लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी नुकतीच दिली आहे. लोकसभेत आम्ही कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com