New Dehli News : टोल प्लाझावर होत असलेल्या वेळ, पैशांची बचत करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टोल संदर्भात मोठी घोषणा केली. सध्याची टोल प्रणाली बंद करीत याच वेळी त्यांनी सॅटेलाइट टोल कलेक्शन प्रणाली सुरु करण्याची घोषणा केली.
केंद्र सरकार टोल बंद करीत असून येत्या काळात लवकरच सॅटेलाइट टोल कलेक्शन सुरू करण्यात येईल. यामुळे टोल कलेक्शन वाढणार असून त्यासोबतच टोल प्लाझावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Nitin Gadakri News)
राज्यसभेत शुक्रवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी (NItin Gadkari) यांनी लेखी उत्तरासंबधी बोलत होते. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय ग्लोबल नेव्हीहेशन सॅटेलाइट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. मात्र, ही सुविधा काही निवडक टोल प्लाझावर सुरु करण्यात येणार आहे. राज्यसभेत उत्तर देण्यापूर्वी गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आता आम्ही टोल प्लाझा बंद करीत आहोत अनक सॅटेलाइटच्या माध्यमातून टोल वसूल केला जाणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
यामध्ये आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील व जेवढे पैसे कापले जातील तेवढे अंतरही या वाहनाच्या माध्यमातून कापता येणार आहे. त्यानुसारच पैसे घेतले जातील. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
देशात आगामी सहा महिन्यात टोल प्लाझावर टोल टॅक्स वसुल करण्याची बद्धत बदलणार आहे. या बदलासोबत टोल प्लाझावर (Toll Plaza) लागणारी गर्दी कमी करणे तसेच किती अंतर प्रवास करणार यावर टोल घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
देशात सध्या हाय वे टोल प्लाझाला बदलण्यासाठी सरकार पुढील 6 महिन्यात जीपीएस आधारीत टोल कलेक्शन सिस्टम सोबत नवीन टेक्नोलॉजीला आणणार आहे. ट्रॅफिकला कमी करणे आणि वाहन चालकांना हायवेवरील अंतराप्रमाणे टोल वसूल करणे, हा या टेक्नोलॉजी मागचा उद्देश असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.