.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Bihar CM latest update : देशातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी नेहमीच बिहार हे राज्य राहिले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागील काही वर्षांतील राजकीय निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच सलग दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले नितीश कुमार आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. नितीश कुमार हे राज्यसभेत जाऊ शकतात, या चर्चांनी बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बिहारमध्ये एनडीएच्या आमदारांची तातडीने बैठक बोलाविण्यात आल्याने या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीश कुमार दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होतील, अशी चर्चा आहे.
राज्यात नितीश कुमार यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र निशांत कुमार पुढे नेऊ शकतात. त्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते, असे तर्कवितर्क लढविले जात आहे. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरून दावा स्वाभाविक आहे. नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यास भाजप या पदावर दावा सांगेल. मात्र, अद्याप याबाबत कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा हे आज सकाळीत तातडीने दिल्लीतून पाटणामध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री व पक्षातील ज्येष्ठ नेते राजीव रंजन सिंह याचीही भेट घेतल्याचे समजते. एनडीएच्या बैठकीत त्यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. जेडीयूमधील अनेक नेत्यांनी यापूर्वीच निशांत कुमार यांच्या राजकीय प्रवेशावर भाष्य केले होते.
नितीश कुमार राज्यसभेत गेल्यानंतर निशांत कुमार हे राज्याच्या राजकारणात पूर्ण ताकदीने सक्रीय होऊ शकतात, अशी चर्चा नेत्यांमध्ये आहे. त्याचप्रमाणे जेडीयूला आगामी काळात भाजपसोबतच सत्तेत राहायचे असल्यास केंद्रातून ताकद मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी नितीश कुमार दिल्लीत असावेत, अशीही नेत्यांची भावना आहे. केंद्रात नितीश कुमार आणि राज्यात निशांत कुमार अशी रणनीती निश्चित केली जात असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.