Bihar Politics : बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार कोसळले आहे. महागठबंधनचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडेल सुपूर्द केला आहे. आरजेडी सोबत काडीमोड घेत नितीशकुमार हे आता भाजपसोबत सत्तास्थापन करणार आहेत. एनडीएचा बिहारमधील घटक हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर) 'हम', आरएलजेडी आणि एलजेपीचे दोन्ही गटही जेडीयू-भाजप सरकारमध्ये सामील होणार आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचा ‘एनडीए’मध्ये पुन्हा प्रवेश हा इंडिया आघाडीसाठी अडचणीचा ठरणार आहे. याचा मोठा फटका इंडिया आघाडीला उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये बसण्याची शक्यता आहे. भाजपने बिहारचे जननायक कर्पूरी ठाकूर यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न जाहीर केल्यानंतर भाजपसोबत सत्तास्थापन करण्याच्या नितीशकुमार यांच्या घडामोडींना वेग आला होता. Nitish Kumar Resign
आज सकाळी नितीश कुमार यांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत महाआघाडीची साथ सोडत राजीनामा देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर आपल्या समर्थकांसोबत राज्यपाल भवनात गेले. तेथे त्यांनी आपली राजीनामा राजेंद्र आरलेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.