"नसबंदी केल्यासारखी माझी स्थिती" : हार्दिक पटेलांची काँग्रेसच्या कारभारावर जाहीर नाराजी

Hardik Patel | Congress | Gujrat : काँग्रेसमध्ये निर्णय शक्तीचा आभाव आहे
Hardik Patel | Congress
Hardik Patel | CongressSarkarnama

गांधीनगर : वर्षाअखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गुजरात (Gujrat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. पाटीदार समाजाचे नेते आणि प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त करत टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप करत "नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे", असे वक्तव्य करत हार्दिक पटेल यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे. (“My position in the party is that of a newly married groom who has been made to undergo nasbandi (vasectomy).” निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हार्दिक पटेल म्हणाले, काँग्रेसमध्ये निर्णय शक्तीचा आभाव आहे. केंद्रात आणि राज्यात जास्त नेते असल्याने पक्षात कोणताही निर्णय होत नाही. पाटीदार नेते नरेश पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयावर होत असलेल्या विलंबावर देखील हार्दिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विलंबामुळे समाजाचा अपमान होतं आहे आणि हा अपमान सहन केला जाणार नाही. दोन महिने झाले मात्र अद्याप त्यांच्या प्रवेशाबद्दलचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वाने लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही पटेल यांनी केली आहे.

Hardik Patel | Congress
खळबळजनक : जमिनीच्या वादाचा बदला म्हणून थेट बियाणींच्या हत्येत आरोपी करण्याचा प्लॅन

इंडिनय एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पटेल यांनी प्रदेश काँग्रेस समितीवर देखील आरोप केले आहेत. मला कोणत्याही बैठकांना बोलवले जात नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माला सल्ला, मत विचारले जात नाही किंवा त्यावर विचार केला जात नाही. मग या पदाचा उपयोग काय? गुरजात काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष होणे याचा अर्थ नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी अवस्था करुन घेणे आहे. काँग्रेसमध्ये अनेक लोकांचे मत आहे की पक्ष हार्दिक पटेलचा योग्य वापर करुन घेत नाही.

Hardik Patel | Congress
राजकारण तापलं! सोमय्यांच्या रडारवर ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य

हार्दिक पटेल निवडणूक लढणार?

हार्दिक पटेल यांची नाराजी समोर येण्यापूर्वी काही दिवसांआधी सर्वोच्च न्यायालयाने पाटीदार आरक्षण आंदोलनातील हिंसाचारात दोषी असण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता हार्दिक पटेल निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी पक्षांकडून हार्दिक यांच्या या आरोपांना कसा प्रतिसाद मिळणार आणि ही नाराजी नेमकी कुठे पर्यंत जाणार हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com