राजकारण तापलं! सोमय्यांच्या रडारवर ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.
Kirit somaiya
Kirit somaiya Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. यामुळे चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या जामीन मिळताच मुंबईत अवतरले आहेत. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबीयांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांच्या रडारवर आता ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य आला आहे.

सोमय्या म्हणाले की, उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा गैरव्यवहार उघड करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हणाची मालमत्ता जप्त होऊनही ते गप्प का आहेत? डझनभर लोकांची प्रॉपर्टी जप्त झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसह संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, आनंदराव अडसूळ यांची संपत्ती जप्त झाली आहे.

Kirit somaiya
कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला? फक्त तीनच तासांत होणार फैसला

सोमय्या म्हणाले की, विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं समर्थन दिलं होतं. मात्र, संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि यालाच सेटींग म्हणतात. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून, ती कधीच वेगळी होणार नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेनेची ही स्टंटबाजी असून, उद्या ऊद्धव ठाकरेंच्या कुटूंबातील आणखी एक गैरव्यवहार बाहेर काढणार आहे.

Kirit somaiya
एनसीबीवर नामुष्की! आर्यन खान प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांत बचावासाठी जमा केलेल्या पैशात सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल (ता.13) त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com