हिमालयातला 'योगी' सुब्रमण्यमचं? चित्रा रामकृष्ण बनल्या होत्या हातातील बाहुले

'सेबी' (SEBI) ने शुक्रवारी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
Chitra Rankrishna
Chitra RankrishnaSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Rankrishna) यांच्याबाबतीत अनेक खुलासे बाहेर येत आहेत. मागील वीस वर्षांपासून त्या हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होत्या. तसेच शेअर बाजाराशी संबंधित महत्वाची माहितीही योगीला पाठवत होत्या. पण आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत. (Share Market)

'सेबी' (SEBI) ने शुक्रवारी काढलेल्या 190 पानी आदेशामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एनएसईमध्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. त्या मागील वीस वर्षांपासून योगीच्या संपर्कात होत्या. पण त्याला कधीही पाहिलेले नाही. त्या योगीला शिरोमणी असं म्हणतात. कथित योगी कोणत्याही ठिकाणी प्रकट होऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे.

Chitra Rankrishna
'योगी'च्या नादी लागल्या अन् शेअर बाजारात घेतले अनेक धक्कादायक निर्णय; 'सेबी'चा खुलासा

योगीच्या सल्ल्याने रामकृष्ण यांनी 2013 मध्ये बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार म्हणून आनंद सुब्रमण्यम (Anand Subramanian) यांची नियुक्ती केली. तसेच त्यांच्या वेतनातही भरमसाठ वाढ करण्यात आली. पण हे सुब्रमण्यमचं कथित योगी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पण त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत. एनएसईच्या 27 नोव्हेंबर 2018 रोजीच्या पत्रात याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. एनएसईच्या कायदेशीर सल्लागारांनी लोकांच्या मानसिकतेशीसंबंधित तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली होती.

मानसशास्त्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुब्रमण्यमनं यानेच योगीच्या माध्यमातून दुसरी ओळख निर्माण करत रामकृष्ण यांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्यानुसार तो आपल्याला हवे ते निर्णय रामकृष्ण यांच्या माध्यमातून घेत होता. एकच व्यक्ती वेगळ्या ओळखीच्या माध्यमातून रामकृष्ण यांना भ्रमित करत होती. त्यामध्ये एक म्हणजे सुब्रमण्यम आणि दुसरी व्यक्ती कथित योगी होती,' असं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्ता म्हटले आहे. पण सेबीकडे ठोस पुरावे नसल्याने याबाबत अजूनही गुढ कायम आहे.

Chitra Rankrishna
कोण गाठणार 'मॅजिक फिगर'? फडणवीसांचा 'या' मतदारसंघांमध्ये लागणार कस!

रामकृष्ण यांनी मात्र ही तिसरी व्यक्ती सुब्रमण्यम असल्याचा दावा फेटाळला आहे. पण फॉरेन्सिक तपासणीमध्ये त्या वापरत असलेला rigyajursama@outlook.com हा ईमेल आयडी सुब्रमण्यमचा होता, असं सेबीच्या आदेशात म्हटलं आहे. एनएसईने याबाबतचा सविस्तर अहवाल मे व जुलै 2018 मध्ये सेबीला पाठवला असून त्यामध्येही कथित योगी सुब्रमण्यमच होता, असं नमूद करण्यात आलं आहे.

सुब्रमण्यमच्या वेतनात भरमसाठ वाढ

सुब्रमण्यमला ज्या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं, त्याचा त्यांना अनुभवही नव्हता. पण योगीच्या सांगण्यावरून ही नियुक्ती करण्यात आली. सुब्रमण्यम यांची नियुक्ती 2013 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वेतन 1.68 कोटी होती. दोन वर्षांत हे वेतन तब्बल पाच कोटींवर पोहचले. हे सर्व योगीच्या सल्ल्याने सुरू होते. अनियमितता समोर आल्यानंतर रामकृष्ण यांनी डिसेंबर 2016 मध्ये पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या चौकशीत अनेक खुलासे समोर आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com