Pune By-Election : कसबा-चिंचवडमध्ये भाजपची सावध खेळी : आघाडीनंतरच उमेदवार जाहीर करणार!

Pune By-Election : "घोषणा ५ फेब्रुवारीला दिल्लीतच होईल.."
Pune By-Election :
Pune By-Election : Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : आमदारांच्या निधनामुळे कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेची २६ फेब्रुवारीला होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपने हुषारीने डाव टाकण्याचे ठरवले असून, महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ते आपले उमेदवार जाहीर करणार असल्याचे आज समजले.

निधन झालेले चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबियांची भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (ता.२८) रात्री खास भेट घेऊन सांत्वन केले. कुटुंबातील सर्वांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी दिवगंत आ.जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांच्याशी त्यांनी खास वेगळी चर्चा चिंचवडच्या निवडणुकीसंदर्भात केल्याचे समजते. उमेदवार कोण असावा, यावरच ती चर्चा झाली.

३ जानेवारीला लक्ष्मण जगतापांचे निधन झाल्यानंतर त्याच दिवशी फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील जगतापांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले होते. त्यानंतर १४ तारखेच्या लक्ष्मणभाऊंच्या श्रद्धांजलीच्या सर्वपक्षीय सभेलाही ते उपस्थित राहिले होते. त्यानंतर २५ तारखेला ते भोसरीत इंद्रायणी थडी जत्रेच्या उदघाटनासाठी आले होते. पण, या तिन्ही वेळेला त्यांनी जगताप कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे काल त्यांनी आपल्या पुणे दौऱ्यात खास वेळ काढून जगताप कुटुंबियांची भेट घेतली.

Pune By-Election :
Pimpri ED Raid News Update : पुरावेच नष्ट करण्याचा प्रयत्न; मुलचंदानी कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, भाजपचा चिंचवडचा उमेदवार जवळपास नक्की झाला असून, तेथून दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नींनाच तिकिट देण्याचे ठरले असल्याचे पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने `सरकारनामा`ला सांगितले.

Pune By-Election :
Sanjay Raut on Hindu March : ... म्हणूनच शिवसेनाभवनपुढं आक्रोश; संजय राऊत यांनी सांगितलं कारण

मात्र, ही घोषणा ५ फेब्रुवारीला दिल्लीत होईल, असे तो म्हणाला. तसेच तोपर्यंत आघाडीचा उमेदवार २ तारखेला जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यानंतर आपला उमेदवार घोषित करण्याची खेळी भाजप खेळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com