Srinagar graveyard controversy : मुख्यमंत्र्यांसोबत पोलिसांची झटापट; भाजपचा विरोध जुगारून भिंतीवर चढत गाठले शहीद स्मारक

Omar Abdullah’s Surprising Visit to Naqshband Sahib Graveyard : जम्मू आणि काश्मीरमध्ये 13 जुलै हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, कलम 370 हटविल्यानंतर हा दिवस साजरा करणे बंद करण्यात आले आहे.
Former Jammu & Kashmir CM Omar Abdullah seen near the Naqshband Sahib graveyard after allegedly hopping a wall to pay respects amid security restrictions.
Former Jammu & Kashmir CM Omar Abdullah seen near the Naqshband Sahib graveyard after allegedly hopping a wall to pay respects amid security restrictions. Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात काय?

  • जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पोलिसांमध्ये झटापट झाली, पोलिसांनी त्यांना शहीद स्मारकापर्यंत जाण्यापासून रोखले.

  • कलम 370 हटवल्यानंतर शहीद दिन साजरा करणं बंद करण्यात आलं होतं, पण नव्या सरकारच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच शहीद दिन असल्याने ओमर यांनी श्रद्धांजलीसाठी ठाम भूमिका घेतली.

  • गेट बंद असल्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी भिंत ओलांडून स्मारकामध्ये प्रवेश केला व नायब राज्यपालांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

Political Reactions Across Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमध्ये शहीद दिनानिमित्त राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सोमवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी त्यांना शहीद स्मारकापर्यंत जाण्यासाठी रोखल्याने त्यांनी दूरवर चालत जात स्मारकाची संरक्षक भिंतीवर चढून आत प्रवेश केला आणि श्रद्धांजली वाहिली. या प्रकारामुळे सत्ताधारी नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 13 जुलै हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, कलम 370 हटविल्यानंतर हा दिवस साजरा करणे बंद करण्यात आले आहे. तसेच शासकीय सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणूक होऊन सरकार अस्तित्वात आल्यानंतर हा रविवारी पहिलाच शहीद दिन होता.

शहीद दिन साजरा करण्यास भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. ओमर अब्दुल्ला यांनी शहीद दिनाची तुलना जालीयनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. ब्रिटिशांशी लढताना शहीद झालेल्या नायकांना आज व्हिलन ठरवले जात आहे, हे दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. तसेच स्थानिक प्रशासनाने नेत्यांना नजरकैदेत ठेवल्याचा दावाही त्यांनी केला होता.

Former Jammu & Kashmir CM Omar Abdullah seen near the Naqshband Sahib graveyard after allegedly hopping a wall to pay respects amid security restrictions.
Governor Appointments : मोदींकडून चंद्राबाबूंना मोठं गिफ्ट; बड्या नेत्याची राज्यपालपदी बढती...

यावरून वाद सुरू असतानाच पोलिसांचा बंदोबस्त जुगारून सोमवारी ओमर अब्दुल्ला शहीद स्मारकाकडे निघाले होते. मात्र, त्यांचा ताफा बॅरिकेड्स लावून पोलिसांनी अडवला. त्यानंतर ते चालत निघाले. पण पोलिसांना त्यांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्यासोबत झटापट झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला आहे.

स्थानिक प्रशासनाने स्मारकामध्ये जाण्याच्या गेटला कुलूप लावले होते. त्यामुळे अब्दुल्ला यांनी संरक्षक भिंत ओलांडून आतमध्ये प्रवेश केला आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही सहकारीही होते. या सर्व प्रकारावरून अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षपणे नायब राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

Former Jammu & Kashmir CM Omar Abdullah seen near the Naqshband Sahib graveyard after allegedly hopping a wall to pay respects amid security restrictions.
BJP Politics : भाजप अजूनही लोकसभेच्या धक्क्यात; सर्वात मोठ्या राज्यात सतावतोय विरोधकांचा तो ‘फॉर्म्यूला’

अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडून न आलेल्या सरकारने (नायब राज्यपाल) माझा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला आणि मला नौहट्टा चौकातून पायी जाण्यासाठी भाग पाडले. त्यांनी नक्शबंद साहबच्या दर्ग्याचा दरवाजा बंद केला. त्यामुळे मला भिंतीवर चढून आत जावे लागले. त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला. पण आज मी थांबणार नव्हतो, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: ओमर अब्दुल्ला यांनी शहीद स्मारकात कसा प्रवेश केला?
    उत्तर: पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी भिंत ओलांडून स्मारकामध्ये प्रवेश केला.

  • प्रश्न: शहीद दिन साजरा करणे का वादग्रस्त ठरले?
    उत्तर: कलम 370 रद्द झाल्यानंतर शासकीय सुट्टी रद्द करण्यात आल्याने त्याचा विरोध झाला.

  • प्रश्न: ओमर अब्दुल्ला यांचा प्रशासनावर काय आरोप आहे?
    उत्तर: त्यांनी आपला मार्ग अडवण्यात आला व नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला.

  • प्रश्न: हा वाद कोणत्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला?
    उत्तर: ओमर अब्दुल्ला यांनी एक्स (आधीचे ट्विटर) वर व्हिडीओसह पोस्ट करून प्रशासनावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com