देशात Omicron चा तिसरा रुग्ण गुजरातमध्ये

झिम्बाब्वेमधून आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉन (Omicron) व्हेरीयंटची लागण
Omicron
Omicron

नवी दिल्ली : गुजरातमधील (Gujarat) जामनगरमधून ओमिक्रॉनचे व्हेरीयंट (Omicron Variant) पहिले प्रकरण समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) 72 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टसह जामनगरमध्ये आली होती. झिम्बाब्वेमधून आलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरीयंटची लागण झाली आहे. त्याचे नमुने पुण्यातील राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. देशातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचे हे तिसरे प्रकरण आहे.

ओमिक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले होते. त्यापैकी एक 66 वर्षीय परदेशी नागरिक आहे, जो नुकताच दक्षिण आफ्रिकेत गेला होता. तर दुसरा बंगळुरूमधील बोमनहल्ली येथील 46 वर्षीय आरोग्य कर्मचारी आहे. दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या नमुन्यात ओमिक्रॉन व्हेरीयंट आढळून आले.

Omicron
आफ्रिकेतून पिंपरीत आलेले तिघे पॉझीटीव्ह, पालिका प्रशासन चिंतेत

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटमुळे आता तिसरी लाट येणार, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. याबाबत केंद्र सरकारने म्हटले आहे की, Omicron भारतासह इतर देशांमध्ये पसरू शकतो. कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारापेक्षा ओमिक्रॉन प्रकार पाचपट जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर्वीसारखीच खबरदारी घेण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.

डेल्टा प्रकारापेक्षा वेगळी लक्षणे?

Omicron बद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, Omicron variant ची लागण झालेल्या रुग्णांना अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या व्हेरियंटची वैशिष्ट्ये डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगळी आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चव आणि वास घेण्याच्या क्षमतेमध्ये कोणताही बदल दिसून आलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांना संसर्ग झाला असला तरी त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत, असे ओमिक्रॉनचा शोध घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com