आफ्रिकेतून पिंपरीत आलेले तिघे पॉझीटीव्ह, पालिका प्रशासन चिंतेत

आफ्रिका खंडातील नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri -Chinchwad) आलेल्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे.
Corona
CoronaSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : कोरोनाच्या (Covid-19) `ओमीक्रॉन` (omocron-variant) या नव्या उत्पपरिवर्तित विषाणूचा आता जगभर फैलाव होऊ लागला आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशात वेगाने पसरणारा हा विषाणू आढळला आहे. दुसरीकडे भारतातही (कर्नाटक) ओमीक्रॉनचे दोन रुग्ण दिसून आल्याने केंद्र व राज्य सरकारेही सतर्क झाली आहेत.

Corona
धक्कादायक : ऑक्सिजन अभावी किती मृत्यू ; ठाकरे सरकार म्हणतं, 'माहित नाही'

दरम्यान, आफ्रिका खंडातील नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri -Chinchwad) आलेले तिघे व त्यांच्या संपर्कातील तीन अशा सहाजणांना कोरोना संसर्गाचा प्रार्दूभाव झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) प्रशासन सध्या चिंतेत असून अधिक सतर्क झाले आहे.

नायजेरियातून आलेल्या व कोरोनाची लागण झालेल्या सहाही जणांना पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर, त्यांच्या संपर्कातील इतर सर्वांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या सहाजणांना ओमीक्रॉन झाला आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमूने पुणे येथील `एनआयए`त `जिनोम सिकव्हेंसिग`या चाचणीकरिता पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सात दिवसांनी भेटतो. त्यामुळे त्यांना ओमीक्रॉन झाला आहे, की नाही, हे या चाचणीला अहवाल आल्यानंतरच कळणार असल्याचे पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शुक्रवारी (ता. 3 डिसेंबर) `सरकारनामा`ला सांगितले.

Corona
निवडणूक जवळ आली अन पाणीप्रश्नाची जाणीव झाली

दोन रुग्णांचे नमूने तीन दिवसांपूर्वी पाठवण्यात आले आहेत. तर, काल (ता. 2 डिसेंबर) कोरोना पॉझीटीव्ह आढळलेल्याचा हा नमूना काल ओमीक्रॉन झाला आहे की नाही, हे सिद्ध करणाऱ्या टेस्टसाठी देण्यात आला आहे. या सहापैकी एकाला, जरी ओमीक्रॉनचा संसर्ग झाल्याचे तपासणीत दिसून आले, तर प्रशासनाची चिंता वाढणार आहे. त्यांना अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना नियंत्रणात आल्याने काहीसे चिंतामुक्त झालेल्या प्रशासनाला पुन्हा नव्या जोमाने नव्या उपाययोजना सुरु कराव्या लागणार आहेत. दरम्यान, काल शहरात नव्या ४६ कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com