Congress Criticized Narendra Modi And RSS
Congress Criticized Narendra Modi And RSSSarkarnama

Manoj Soni : UPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस संतापली; मोदी सरकार अन् 'RSS'वर केला गंभीर आरोप

UPSC Scam in India Congress Criticized Narendra Modi And RSS : देशभरात यूपीएससी'च्या कारभारावर टीका सुरु असतानाच आता केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Published on

UPSC News : राज्यासह देशभरात पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पूजा नंतर आणखी अशाच काही बनावट माहितीच्या आणि कागदपत्रांच्या आधारे सरकारी अधिकारी बनलेल्या उमेदवारांचे घोटाळे समोर येत आहेत.

या सर्व प्रकरणामुळे 'यूपीएससी'च्या (UPSC) कार्यपद्धतीवर सर्वसामान्य लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. देशभरात यूपीएससी'च्या कारभारावर टीका सुरु असतानाच आता केंद्रीय लोकसभा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कारण मनोज सोनी (Manoj Soni) हे 2017 साली यूपीएससी'च्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. तर 16 मे 2023 रोजी त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता. मात्र, त्यांनी आपला कार्यकाळ संपण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता याच सर्व प्रकरणावरुन काँग्रेसने (Congress) मोदी सरकार आणि 'आरएसएस'वर सडकून टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

Congress Criticized Narendra Modi And RSS
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा जबाब नोंदविला ?

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी 'एक्स'वर एक पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी सराकर आणि आरएसएसकडून देशातील संविधानिक संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच या संस्थांची प्रतिष्ठा आणि स्वायत्तता धोक्यात आली आहे. यूपीएससी परीक्षेतील काही घोटाळे मागील दिवसात समोर आले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा गंभीर विषय आहे.

Congress Criticized Narendra Modi And RSS
Ujjwal Nikam On Pooja Khedkar Case : उज्ज्वल निकम यांची पूजा खेडकर प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; UPSC कडे केली 'ही' मोठी डिमांड

तर यूपीएससीच्या अध्यक्षांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय एक महिना गुप्त का ठेवण्यात आला? तसेच मागील काही दिवसांत उघडकीस आलेले घोटाळे आणि यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा याचा काही संबंध आहे का? असे सवाल उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खरगे यांनी केली.

शिवाय या सर्व प्रकरणी मोदी सरकारने आपली चूक मान्य केली पाहिजे. मागील काही दिवसांत खोटी जात आणि वैद्यकीय प्रमाणपत्रं सादर केल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. हा दिवस-रात्र मेहनत करून परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात असून त्यांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरण्याचे काम झालं आहे, असंही खरगे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता यूपीएससी प्रकरणावरुन विरोधक चांगलेचं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com