
Indian Army, Operation Sindoor, India Pakistan News:भारतीय लष्कराने मंगळवारी मध्यरात्री एअर स्ट्राइक करीत पाकिस्तानच्या 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. भारतीय लष्कराचे तीनही दलाने ही कारवाई करीत पाकिस्तानाच्या दहशतवाद्याचे कंबरडं मोडलं आहे.
लष्कराच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत आहे की तीन ही सैन्यदलाचे अध्यक्ष हे बॅचमेट आहेत. ते 1984 मध्ये पुण्यातील एनडीए मधून प्रशिक्षण पूर्ण करुन देशसेवेत सामील झाले होते. हे तीनही मित्र आपल्या दलाचे नेतृत्व करीत आहेत. पाकिस्तान झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतची रणनीती या तीनही मित्रांनी तयार केली अन् प्रत्यक्षात आणली.हे तीन मित्र कोण आहेत हे जाणून घेऊयात लेफ्टनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी सैन्यदलाचे प्रमुख,एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे नौसेना तर मार्शल अमर प्रीत सिंह हे हवाईदलाचे नेतृत्व करीत आहेत.
उपेंद्र द्विवेदी (Upendra Dwivedi): उपेंद्र द्विवेदी यांची 30 जून 2024 रोजी भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. 1 जुलै 1964 रोजी मध्य प्रदेशात जन्मलेले उपेंद्र द्विवेदी यांचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूलमध्ये झाले. 1981 मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, त्यावेळी एडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांचे बॅंचमेट होते. दिनेश त्रिपाठी हे नौदलाचे प्रमुख आहेत.
उपेंद्र द्विवेदी यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथून पदवी प्राप्त केली आहे. येथे त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल ब्लू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यानंतर उपेंद्र द्विवेदी यांना १५ डिसेंबर १९८४ रोजी डेहराडूनयेथील भारतीय लष्करी अकादमी (आयएमए) येथून जम्मू-काश्मीर रायफल्सच्या १८ व्या बटालियनमध्ये सेवेत सहभागी झाले. उपेंद्र द्विवेदी यांनी स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि मिलिटरी सायन्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, शिवाय त्यांनी एम.फिल केले आहे. उपेंद्र द्विवेदी यांनी आपल्या ३९ वर्षांच्या कारकिर्दीत जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील दहशतवाद विरोधी आणि सीमा सुरक्षेसह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.
अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी (नौदलप्रमुख): अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची 30 मे 2024 रोजी नौदल प्रमुख (सीएनएस)म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिनेश त्रिपाठी यांचा जन्म 15 मे 1964 रोजी उत्तर प्रदेशातील एका खेड्यात झाला. एका सरकारी शाळेतून इयत्ता पाचवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिनेश कुमार त्रिपाठी यांनी १९७३ मध्ये रीवा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. दिनेश कुमार त्रिपाठी यांनी नेव्हल हायर कमांड कोर्स, करंज येथून नेव्हल ऑपरेशन ट्रेनिंग घेतले आहे.त्यांनी न्यूपोर्टच्या यूएस नेव्हल वॉर कॉलेजमधून नेव्हल कमांड कोर्स केला आहे.त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ पदही भूषवले आहे.
एअर मार्शल अमरप्रीत सिंह (हवाई दलप्रमुख): 30 सप्टेंबर 2024 रोजी एअर मार्शल अमरप्रीत सिंह यांची हवाई दलप्रमुख (सीएएस) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिग-२१, मिग-२९, सुखोई-३० एमकेआय आणि इतर विमाने उडवणारे ते प्रशिक्षित लढाऊ वैमानिक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.