Amit Shah Speech in Loksabha: जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी अविश्वास प्रस्ताव; अमित शाहांनी विरोधकांना सुनावलं

Amit Shah On No-Confidence Motion : ''ये तो ट्रेलर है..!'', अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: संसदेत मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या अविश्वास प्रस्तावावर बोलताना संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव हा संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचे सांगत जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत, असा हल्लाबोल शाहांनी विरोधकांवर केला.

"मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे देशातील जनतेचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मोदी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत. जनतेने दोनवेळा मोदी सरकारला बहुमत दिले. मोदी 17-17 तास काम करणारे पंतप्रधान असून मोदींनी घराणेशाहीला आळा घातला. 'ये तो ट्रेलर है..!", असे सांगत शाहांनी विरोधी पक्षांना थेट इशारा दिला.

Amit Shah
Babri Masjid Case : बाबरीप्रकरणी काय घडलं ? ; शरद पवारांनी 'त्या' बैठकीबाबत सांगितलं..; नरसिंह रावांनी भाजपवर विश्वास ठेवला..

"एकही सुट्टी न घेता काम करणारे एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. २००८ मध्येही अविश्वास दर्शक प्रस्ताव आणला होता. त्यावेळी लोकप्रतिनिधींना पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व नियम धाब्यावर बसवून सत्ता राखणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट", असा गंभीर आरोप शाहांनी काँग्रेसवर केला.

Amit Shah
Rahul Gandhi Flying Kiss : 'फ्लाईंग किस' करताना काय म्हणाले राहुल गांधी ?

विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून मंगळवारपासून संसदेत चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर आज शाहांनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार केला.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com