Uniform Civil Code News: समान नागरी कायद्याची जोरदार चर्चा; काँग्रेस, आप, राष्ट्रवादी, ठाकरे गटासह विरोधी पक्षाची भूमिका काय?

Central Government: पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
Uniform Civil Code News
Uniform Civil Code NewsSarkarnama
Published on
Updated on

Political News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपने तर देशभरात'मोदी@9' या अभियानांतर्गत मेळावे, सभा घेतल्या आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून भाजप आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचे जोरदार समर्थन केल्यामुळे आता मोठी चर्चा रंगली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत दिल्यामुळे देशातील राजकीय पक्ष या कायद्याबाबतची आपली भूमिका मांडताना दिसून येत आहेत. समान नागरी कायद्याला आम आदमी पार्टी आणि शिवसेनेने (ठाकरे गट) पाठिंबा दर्शविला.

मात्र, काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. "या कायद्यामुळे फक्त मुस्लिमांना अडचणी निर्माण होणार नाहीत तर हिंदुंना देखील अडचणीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे सरकारने याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे", असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Uniform Civil Code News
Congress News: मोदींनी समान नागरी कायद्याचे संकेत देताच काँग्रेसने घेतला मोठा निर्णय; थेट नेमली समिती

महाराष्ट्र काँग्रेसने या समान नागरी कायद्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यावर आपलं मत मांडत "सर्वांचं मत लक्षात घेऊन निर्णय घ्यावा", असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे.

आता या समान नागरी कायद्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनीही आपली भूमिका मांडली आहे. यूसीसी (समान नागरी कायदा) लागू केल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा विचार सरकारने केला पाहिजे, असं मत फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं.

Uniform Civil Code News
MLA Senthil Balaji: स्टॅलिन सरकारला धक्का; राज्यपालांनी मंत्र्यांची केली थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी

"सरकारने समान नागरी कायद्यावर जास्त जोर देऊ नये. त्याची अंमलबजावणी केल्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करा. हा देश विविधतेने भरलेला असून विविध धर्म आणि जातीचे लोक देशात राहतात. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा", असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले.

तर दुसरीकडे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी समान नागरी कायद्यावरील चर्चेला षडयंत्र म्हटलं. तसेच याबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही आपलं मत मांडलं. "आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालायचे असून आपण देशातील कोणत्याही एका घटकाला विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं मत काय?

समान नागरी कायद्यासंदर्भातील चर्चा सध्या देशभरात सुरू आहेत. याबाबत आता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डही अलर्ट झालं असून 27 जूनला तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत यूसीसी कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com