Amit Shah Gandhinagar Meeting: अमित शाहांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषद; 'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा

BJP Gujarat Meeting: अमित शाह यांच्या उपस्थित गुजरातमधील गांधीनगर येथे सोमवारी २६ व्या क्षेत्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Gujarat Meeting  | Amit Shah
Gujarat Meeting | Amit ShahSarkarnama

Gandhinagar (Gujrat): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित गुजरातमधील गांधीनगर येथे सोमवारी २६ व्या क्षेत्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत शारीरिक शोषण, अत्याचार, अशा प्रकरणाची तात्काळ चौकशी यासह पायाभूत सुविधा तसंच पर्यावरणाशी निगडीत विषयावर चर्चा केली जाणार आहे.

शेजारील राज्यांमध्ये परस्पर सहयोग निर्माण करण्यासाठी या बैठकीने महत्त्वाची भूमिका बजावली जाऊ शकते असं आयोजकांचं मत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे समजते.

Gujarat Meeting  | Amit Shah
Gadakh Vs Vikhe : गडाख-विखे पुन्हा एकदा लढत ? नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी आघाडीत गडाखांच्या नावावर एकमत..

या क्षेत्रीय परिषदेला गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली दमन आणि दीव या राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या वेळी शारीरिक शोषण, अत्याचार प्रकरणाची तात्काळ चौकशी यासह पायाभूत सुविधा तसंच पर्यावरणाशी निगडीत विषयावर चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच शेजारील राज्यांमध्ये परस्पर सहयोग निर्माण करण्यासाठी ही परिषद महत्पूर्ण ठरणार आहे.

या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक यांच्यासह राज्याचे दोन वरीष्ठ मंत्री बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत. त्यासोबतच प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित राज्याचे प्रशासक या परिषदेचे सदस्य आहेत.

Gujarat Meeting  | Amit Shah
Bhagirath Bhalke Visit : 'बीआरएस' प्रवेशाची घाई केली ? भगीरथ भालके-काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या चर्चेने खळबळ

पाणी समस्येसह इतर प्रश्नांवर चर्चा

या बैठकीत पाणी समस्या, दारू आणि अंमली पदार्थांची घुसखोरी आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील सीमावर्ती भागात रस्ते वाहतूक आणि चेकपोस्ट यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. गुजरात सरकारच्या वतीने आयोजित या बैठकीला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. याआधी परिषदेच्या मुख्य सचिवांची बैठक झाली आहे.

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com