
Panji News : नवीन वर्षात गोव्याच्या मंत्रिमंडळात फेररचना होईल, असे संकेच याधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिले होते. त्याप्रमाणे मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षासह प्रदेशाध्यक्षही बदलले जातील असेही संकेत त्यांनी दिले होते. आता या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच गोव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे.
नव्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी सात जणांनी इच्छा व्यक्त केली आहेत. शुक्रवारी (3 जानेवारी) रात्री त्यांची नावे दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीला पाठवण्यात आली आहेत. यानावांवर अंतिम निर्णय होणार असून शेवटचे नाव गोविंद पर्वतकर यांचे पाठवण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, सध्या मंडळ पातळीवरील अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला गती आली आहे. उत्तर गोव्यासाठी ॲड. मनोहर आडपईकर, तर दक्षिण गोव्यासाठी ॲड. विश्वास सतरकर निवडणूक अधिकारी आहेत. ते निवडणुकीचे काम पाहत आहेत. तर म्हापसा आणि मडगाव येथे नेत्यांची मते गुरूवारीच जाणून घेण्यात आली आहेत.
याबाबतची माहिती गाभा समितीच्या बैठकीत आज देण्यात आली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, समितीचे सदस्य माविन गुदिन्हो, दामू नाईक, रमेश तवडकर, गोविंद पर्वतकर, ॲड. नरेंद्र सावईकर, नीलेश काब्राल, विनय तेंडुलकर, चंद्रकांत कवळेकर आणि दिगंबर कामत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचा रोड मॅप बैठकीत ठेवला. याबाबत त्यांनी संकल्पना मांडली. या बैठकीनंतरच नव्या प्रदेशाध्यक्षसाठी इच्छुक असणाऱ्या ७ जनांची नावे पक्षश्रेष्ठींकडे विचारार्थ पाठविण्याचे ठरविण्यात आले.
नव्या प्रदेशाध्यक्षसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परूळेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, दामू नाईक, माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, गोविंद पर्वतकर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावावर अद्याप चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह हे ५ जानेवारी रोजी गोव्यात येणार आहेत. ते मंडळ आणि जिल्हा समित्यांच्या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहतील. सध्या राज्य पातळीवरील निवडणूक अधिकारी म्हणून प्रेमानंद म्हांबरे काम पाहत आहेत. तर निरीक्षक म्हणून सुनील बन्सल १० रोजी गोव्यात येणार आहेत. ते आल्यानंतरच नव्या प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.