
Explore the Pahalgam attack : अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या बरोबर आधी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना ठार मारले. तर अनेक पर्यटक जखमी देखील झाले आहेत. या दहशतवद्यी हल्ल्याचा संबंध कुठंतरी पाकिस्तानशी जुडत आहे. तर हल्ल्याची जबाबदारी देखील जी दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फ्रंट(टीआरएफ)ने घेतली, ती पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे. काश्मीरमधील स्थानिकांच्या मुखवट्याआड काम करणाऱ्या टीआरएफने यासाठी आपले खास टेरर मॉड्यूल्स फाल्कन स्क्वाडची मदत घेतली होती, जे अतिशय भयानक आणि गतीशील मानले जाते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हीट स्क्वाड आणि फाल्कन स्क्वाड सारखी नावं समोर येत आहेत. ही नावे ऐकण्यात तशी नवीन आहेत. मात्र यांचे दहशतवादी नेटवर्क आणि कार्यशैली जुनी, भयानक आणि अतिशय संघटित दहशतवादी संघटनांशी निगडीत आहे. हा काही साधा समूह नाही, तर एक टेक्निकल टेरेर मॉड्यूल आहे. म्हणजेच छोटे छोटे समूह जे एखाद्या विशेष मिशनासाठी तयार होतात आणि नंतर नष्ट होतात किंवा चेहर बदलतात. म्हणजे हे काही एखाद्या गटाचे नाव नाही, तर एकप्रकारची रणनीती आहे.
हीट स्क्वाडचे काम एखादे विशिष्ट लक्ष्य नष्ट करणं आहे. तेच फाल्कन स्वत:ला रेवेंज ग्रुप सांगतो. याप्रकारे जर बघितलं तर हीट स्क्वाड एक टेक्निक किंवा ऑपरेनशची पद्धत आहे, तर फाल्कन एक विशेष ग्रुप आहे, जो या पद्धतीवर काम करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार आगामी काळात फाल्कन सुरक्षेसाठी एक मोठा धोका असू शकतो.
कारण, द रेजिस्टेंस फ्रंट काश्मीरमध्ये सक्रीय आहे, तर त्यांच्या रणनीतींमध्ये लक्ष्याची रेकी करणे, हत्यारं गोळा करणे, प्रशिक्षण देणे-घेणे आणि हल्ल्यानंतर काश्मीर घाटीच्या जंगलात दडून बसणे आहे. एका रिपोर्टनुसार फाल्कन स्क्वाडला अशातच एक मोठा आधुनिक शस्त्रांचा साठा मिळाला आहे, ज्याचा वापर ते सुरक्षा दल आणि सर्वसामान्यांवर हल्ला करण्यासाठी करत आहेत.
अशाप्रकारे टेरेर मॉड्यूलची पद्धत अतिशय चाणाक्ष आहे. यामध्ये सर्वात जास्त त्रासदायक बाब ही आहे की, दहशतवादी आपल्यासोबत स्थानिक तरूणांची भरती करतात. ते सोशल मीडियाद्वारे धार्मिक कट्टरतावाद पसरवतात आणि ब्रेनवॉश करतात जेणेकरून ते त्यांच्यासोबत जुडतील.
याचे त्यांना दोन फायदे होतात, एक तर हल्ल्यांसाठी मोठे दहशतवादी स्थानिक तरूणांचा वापर करू शकतात आणि दुसरा म्हणजे स्थानिक दहशतवादी निवडल्याने त्यांना स्थानिकांकडून सहानुभूती मिळते व लपण्यासाठी जागाही मिळते. फाल्कन मॉड्यूलचे दहशतवादी प्रत्येकवेळी शस्त्र घेवून फिरत नाहीत, ते सर्वसामान्यांप्रमाणेच राहतात. हल्ला केल्यानंतर शस्त्र गायब करतात आणि आपसात संपर्क ठेवण्यासाठी इंटरनेचा वापर अतिशय हुशारीने करत असतात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.