Pahalgam Terror Attack : खळबळजनक! पहलगामच्या हल्ल्यात दहशतवाद्यांना रसद पुरवणाऱ्याची नदीत उडी? पोलखोल होताच स्वत:ला संपवलं

Pahalgam Terror Attack Update : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीने रसद पुरवल्याची माहिती उघड झाली आहे.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack sarkarnama
Published on
Updated on

Jammu And Kashmir News : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाल्यानंतर आता देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानातून भारतात येऊन दहशवादी हल्ला करणाऱ्या अतिरेकी आणि पाकिस्तानची गय आता करू नये अशी भावना सर्व भारतीयांची असून केंद्र सरकार कडक पावले उचलत आहे. यादरम्यान आता दहशतवाद्यांना एका व्यक्तीने रसद पुरवल्याचे उघड झाले आहे. त्याला दहशतवाद्यांच्या स्थळावर ताब्यात घेण्यात आले होते. मात्र चौकशीला नेत असताना थेट नदीत उडी मारून त्याने स्वत:ला संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील व्हॅलीमध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर 20 हून अधिक लोक जखमी झाले होते. यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या तर NIA सह स्थानिक यंत्रणा तपासात गुंतल्या. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दहशतवाद्यांना एका व्यक्तीने रसद आणि अन्न पुरवल्याची माहिती उघड झाली होती.

ज्यानंतर त्याला दहशतवाद्यांच्या स्थळावर 3 मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्याचे इम्तियाज मगरे (वय-23) असे असून त्याने दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली दिली होती. पण आता इम्तियाज मगरे याने पोलिसांच्या हातातून पळ काढल्याची माहिती उघड झाली आहे. पण त्याने विश्वा नदीत उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झालाचेही आता समोर आले आहे. ही सर्व घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

दरम्यान या हल्ल्यामागील खरे सत्य उलगडणारा एकमेक आणि महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हातातून निसटल्याने जेथून सुरूवात केली तेथेच तपास येऊन थांबला आहे. तर त्याच्या मृत्यूवरून मेहबुबा मुफ्ती यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुफ्ती यांनी, पहलगामच्या हल्ल्यातून जम्मू-काश्मीरचे पर्यटन कमी करण्याचा, सांप्रदायिक सद्भावनेवर घाला घालण्याचा, काश्मीरमधील शांती भंग करण्याचा हा एक नियोजित कट असल्याचे वाटत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलीय.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack: 'NIA' च्या टीमनं दहशतवाद्यांची कुंडली काढली? तब्बल 3 हजार संशयितांची चौकशी,100 ठिकाणी छापेमारी अन्...

तसेच त्यांनी, या प्रकरणानंतर आता येथे मनमानी पद्धतीने लोकांना अटक केली जातेय, घरांना नेस्तनाबूत करून टाकलं जातंय, निर्दोष नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही मुफ्ती यांनी केला आहे. तर हे प्रकरण फारच गंभीर असून याची निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com