

Hanif Abbasi On Ind-Pak War:पहगाम भागात अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा घसा कोरडा पडला आहे. पाकिस्तानी नेते आगपाखड करु लागले असून भारताला पोकळ धमक्या देत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी काल भारताला 'रक्ताचे पाट वाहतील' अशी धमकी दिली होती. आता रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी अण्वस्त्र हल्ल्याबाबत पोकळ धमकी दिली आहे. सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानी मंत्री थयथयाट करीत आहेत.
शाहीन, गौरी, गझनवी आदी १३० अण्वस्त्रं भारतासाठीच ठेवली असल्याचा दर्पोक्तीपूर्ण दावा रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी केला आहे. "तुम्ही आमचे पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू," असे हनीफ अब्बासी यांनी म्हटलं आहे.
मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोदी सरकारने उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेऊन पाकिस्तानचं कंबरड मोडण्यासाठी पाच मोठे निर्णय घेतले. यात सिंधू जलवाटप करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam terror attack) आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणार आहे. एनआयएचे पथक आधीच पहलगाममध्ये पोहोचले आहे आणि त्यांनी आपले काम सुरू केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ही जबाबदारी एनआयएकडे सोपवली आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध केला आहे.सुरक्षा परिषदेने सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायदा आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
सर्व प्रशासकीय संस्थांशी (संबंधित) सक्रिय सहकार्यावर भर देण्यात आला आहे. कोणतेही दहशतवादी कृत्य गुन्हेगारी आहे आणि ते कोणी केले, ते कुठेही असले आणि कोणत्याही प्रेरणेने केले असले तरीही ते समर्थनीय ठरू शकत नाही, असे परिषदेने नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.