Political Horoscope: कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी उद्धव अन् राज यांच्या पत्रिकेतील योग एकत्र येण्यासाठी अनुकूल आहेत का?

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: शिवसेना- मनसे पक्षप्रमुखांच्या पत्रिकेतील योग एकत्र येण्यासाठी प्रतिकूलता दर्शवितात. जागावाटप किंवा अटी-शर्तींमुळे एकमत होणे कठीण राहील.
 Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
Uddhav Thackeray Raj Thackeray AllianceSarkarnama
Published on
Updated on

सिद्धेश्वर मारटकर

२८ एप्रिलच्या अमांत कुंडलीतील ग्रहयोगाचा विचार करता, पुढील काळ युद्ध व नैसर्गिक आपत्तीमधून मोठी हानी दर्शविणारा राहील. भरणी नक्षत्रातील अमावास्या सामूहिक दुर्घटना दर्शविते. विशेष करून उत्तर भारतात पूर, अवकाळी पाऊस, भूकंप यामधून घरांची पडझड, शेतीचे नुकसान होण्याची शक्यता राहील.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसे युतीबाबत ज्योतिषशास्त्र दृष्टीने विचार करता पक्षप्रमुखांच्या राशीमध्ये षडाष्टक (शत्रुत्व) योग असल्याने एकत्र येणे कठीण वाटते. कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी पक्षप्रमुखांच्या पत्रिकेतील योग एकत्र येण्यासाठी प्रतिकूलता दर्शवितात. जागावाटप किंवा अटी-शर्तींमुळे एकमत होणे कठीण राहील.

मंगळ, प्लुटो योगामुळे पुढील काळात विक्रमी तापमान कायम राहण्याची शक्यता असून, या योगामुळे आगीच्या दुर्घटना, मोठे अपघातांचे प्रमाण वाढते राहील. सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असून, भाषावाद, जातीय तणाव, वक्फ बोर्ड कायद्यावरून होणारी निदर्शने, बंद यांवरून हिंसाचार, जाळपोळीच्या घटना होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्ती किंवा ऐतिहासिक स्थळांना या काळात धोका संभवतो.

 Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
Pahalgam Terror Attack: 'बदला घेणार, पण कसा? ठाकरे सेनेनं मोदींना करुन दिली इंदिरा गांधींच्या 'त्या' निर्णयाची आठवण

या योगामुळे सावरलेल्या शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरगुंडी पाहायला मिळेल. सोन्या-चांदीचे भावात घट होईल. मात्र महागाईमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता राहील. चीन-अमेरिका व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, त्याचा इतर देशांना फटका बसू शकतो. त्यामुळे अनेक मोठे उद्योग अडचणीत येतील.

तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता राहील. देशाच्या राजकीय स्थितीमध्ये मोठे बदल या काळात संभवतात. मुख्यमंत्री बदल, राज्य व केंद्र मंत्रिमंडळ विस्तार, पक्षप्रमुखांची नियुक्ती, प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे या घटना प्रामुख्याने अनुभवास येतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा बडतर्फी, निलंबनाच्या घटनाही घडू शकतील. लेखक, कलाकार, साहित्यिकांचे गौरव, मानसन्मान होतील. भारतीय चित्रपटांना मोठे पुरस्कार, मानसन्मान मिळतील.

 Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance
Indus Waters Treaty: काँग्रेसला सरदार पटेलांची आठवण! नेहरूंनी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करून केला सिंधू जल करार

खेळाडू, पोलिस, लष्कर यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. खेळाडूंची दुखापत, वादविवाद; तसेच पोलिस, लष्करावर होणारे हल्ले, अपघात, घातपात या घटना घडण्याची शक्यता आहे. पाण्याचा तुटवडा, धरणातील साठा कमी होणे व अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य अनुभवास येईल.

दक्षिण भारतात विचित्र रोग पसरण्याची शक्यता राहील. गुरू-हर्षल योगामुळे डॉक्टरांवरील हल्ले, हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टर-बँक कर्मचाऱ्यांचे संप, आंदोलने अनुभवास येतील. यामधून डॉक्टर हॉस्पिटल यांच्यावर कायदेशीर कारवाया होतील. तर काही बँका, अर्थसंस्था अडचणीत येतील. बँका, सराफी दुकाने यांच्यावर दरोड्याच्या घटना अनुभवास येतील. मीन राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे परदेशी पर्यटकांची गर्दी वाढेल. परराष्ट्राचे प्रतिनिधींची भारत भेट महत्त्वपूर्ण ठरेल.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे किंवा स्पर्धेचे यजमानपद भारतात मिळेल. संगीत, मनोरंजन, चित्रपट पुरस्कार यांसारखे कार्यक्रम या काळात मोठ्या प्रमाणावर होतील. मात्र या काळात शेजारी देशात भूकंप, पूर, त्सुनामीमुळे मोठी हानी होण्याची शक्यता राहील. या योगामुळे विमान, जहाज दुर्घटना, अपहरण किंवा विमान हेलिकॉप्टर भरकटणे किंवा अपघात यांसारख्या घटना अनुभवास येतील.लहान मुले, विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम यांमध्ये त्रासदायक बदल होतील. विक्रमी तापमानामुळे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढेल.

साप्ताहिक राशिभविष्य २५ एप्रिल ते २ मे २०२५

मेष : मोठा खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. अधिकारात वाढ होईल. २७ एप्रिलची अमावस्या उत्साह वाढविणारी राहील. कुटुंबात आनंदाची घटना घडेल.

वृषभ : मित्र-मैत्रिणांचा सहवास लाभेल. तरुणांचे विवाह जमतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. प्रवास लाभदायक होईल. परदेशातील नोकरीसाठी प्रयत्नांना यश मिळेल.

मिथुन : नोकरी/व्यवसायात उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाच्या कामासाठी महिला वर्गाकडून मदत होईल. हॉटेल, सहली, मनोरंजनासाठी खर्च होईल.

कर्क : प्रसिद्धी, नावलौकीक वाढेल. प्रवास, तीर्थयात्रा होईल. विवाह, समारंभ, कार्यक्रमातून आनंद घ्याल. अमावस्या प्रतिष्ठा, मानसन्मान वाढविणारी राहील.

सिंह : सप्ताहाच्या सुरुवातीला अचानक लाभ होतील. पेन्शन, निवृत्तिवेतन, विमा, वारसा हक्काची कामे होतील. मात्र, प्रवास जपून करावेत, आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या: सप्ताहाच्या सुरुवातीला तरुणीचे विवाह जमतील. भागीदारीमध्ये फायदा होईल. कोर्टकचेरीचे प्रश्न सामंजस्याने सुटतील. अमावस्या आरोग्यासाठी त्रासदायक राहील.

तूळ : नोकरीच्या निमित्ताने मोठे प्रवास होतील. परदेशातील नोकरीसाठी प्रयत्न होतील. जोडीदाराला मान-सन्मान मिळतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होतील. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. उत्तरार्धात आरोग्यात चांगली सुधारणा होईल.

धनू : सुरुवातीला घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. घरातील व्यक्तींचे विवाह जमतील. घरातील वातावरण आनंदी राहील. मुलांना मोठे यश, अधिकार मिळतील.

मकर : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. भावंडांचे विवाह जमतील. कलाकारांना मोठे यश, प्रसिद्धी मिळेल. घरी मोठ्या व्यक्तींचा पाहुणचार कराल.

कुंभ : उत्पन्नात मोठी वाढ होईल. बोलण्यामुळे मोठा फायदा होईल. भावंडांना मोठा अधिकार, प्रमोशन मिळेल. कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी-पुरस्कार मिळतील.

मीन : मनासारख्या घटना घडतील. तरुणाचे विवाह जमतील. वैवाहिक समस्या सुटतील. भागीदारीमध्ये यश मिळेल. ज्येष्ठांसाठी खर्च करावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com