Pahalgam Terror Attack: मोदींच्या करारी जवाबाला पाकिस्तानी नेते घाबरले! लष्कर प्रमुख अन् बिलावल भुट्टोंच्या कुटुंबांचे पलायन

Pakistan Political Crisis: राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांची भेट झाली. नियंत्रणरेषा, संभाव्य हल्ले, त्यावर कारवाई याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सोडणार नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिला.
PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tension
PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tensionSarkarnama
Published on
Updated on

Modi Response to Pakistan: जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये आठ दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला करारा जवाब देण्याासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले आहे.

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये आठ दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी 26 जणांची हत्या केली. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. दहशतवाद्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला करारा जवाब देण्याासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले आहे.

भारतीय लष्कराच्या भीतीनं पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी आपल्या परिवाराला कॅनडा येथे पाठवले आहे. तर यापूर्वी पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही आपल्या परिवाराला पाकिस्तानच्या बाहेर पाठवल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे नेता भारताच्या करारी जवाबाला घाबरले असल्याचे दिसते.

PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tension
Prakash Ambedkar Exclusive Interview: महाराष्ट्रच ठरवेल राष्ट्रीय राजकारणाचा प्रवाह!

देशाचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली. ही बैठक सुमारे 45 मिनिटे सुरु होती. पहलगाम हल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्य आणि रणनीती आखण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांची भेट झाली. नियंत्रणरेषा, संभाव्य हल्ले, त्यावर कारवाई याबाबत यावेळी चर्चा झाल्याचे समजते. दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सोडणार नाही, असा इशारा राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिला.

PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tension
Shivajirao Adhalrao Patil: नेत्यांचा फिटनेस: वयाच्या ६८व्या वर्षीही तिशीतली ऊर्जा!

पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. पंधरा देशाच्या प्रमुखांनी त्याचा निषेध केला आहे. अनेक देशात पाकिस्तानी दूतावासाच्या बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. पाकिस्तानवर कारवाई करा, अशी मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत.

गेल्या 24 तासात भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये 10 दहशतवाद्यांची घरे उद्धवस्त केली आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक बैसरन भागात तपास करीत आहेत. जगभरात या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध होत असताना कॅनाडाने मात्र मौन बाळगले आहे.

G7 देशातील एकमेव कॅनडाने या हल्ल्याबाबत कुठलेही विधान अद्याप केलेले नाही. भारत आणि कॅनाडा यांच्यात सुरु असलेला राजकीय वाद हे मागील कारण असल्याचे बोलले जाते. अमेरिका, ब्रिटेन, फ्रॉन्स, ईराण, आणि तुर्की यांनी या हल्ल्याचा निषेध करुन आम्ही भारताच्या पाठिशी आहोत, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com